आज आपण अशाच एका हॉटेलविषयी जाणून घेणार आहोत. ज्याच्या भाड्यामध्ये तुम्ही आलिशान घर खरेदी करू शकता. या हॉटेलची खास गोष्ट म्हणजे हे हॉटेल पाण्याच्या आत बांधले गेले आहे आणि येथे सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत.
हॉटेलमध्ये तुम्हाला तुमचा स्वतःचा संपूर्ण पर्सनल स्टॉफ मिळेल. तुम्हाला पर्सनल कुक दिला जाईल आणि तुम्हाला प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी खाजगी हेलिकॉप्टरही मिळेल. तुम्हाला जेंव्हा जेंव्हा आणि जे काही खायचे असेल ते तयार करुन लगेच दिले जाईल.
असे हॉटेल कुठे बांधले गेले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर हे हॉटेल सबमरीन हॉटेल आहे, जे द लव्हर्स डीप म्हणून प्रसिद्ध आहे. हे जगातील सर्वात महागडे हॉटेल आहे.
हे हॉटेल पाणबुडीमध्ये आहे आणि सेंट लुसिया या कॅरिबियन बेट राष्ट्रात आहे. सबमरीन हॉटेल खास रोमँटिक अनुभव देण्यासाठी डिझाइन केलेले आहे. येथे राहणाऱ्यांना पाण्याखालील आकर्षक दृश्ये पाहायला मिळतात.
पाणबुडी तुम्हाला खोल निळ्या समुद्रातून घेऊन जाते आणि येथे तुम्हाला महासागराची जबरदस्त नजारे दाखवते. इथे राहण्यासाठी तुम्हाला एका दिवसासाठी सुमारे 292,000 यूएस डॉलर म्हणजेच 2,17,34,450 रुपये खर्च करावे लागतील.