NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / जगातला सर्वात महागडा घटस्फोट, जेफ बेझोसने पत्नीला दिली होती अब्जावधींची पोटगी

जगातला सर्वात महागडा घटस्फोट, जेफ बेझोसने पत्नीला दिली होती अब्जावधींची पोटगी

जगभरात घटस्फोटाची अनेक हाय प्रोफाइल प्रकरणे समोर आली आहेत. पण यात सर्वाधिक चर्चेत राहिला तो अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस आणि त्यांची पत्नी मॅकन्झी बेजोस यांचा घटस्फोट.

17

जगभरात घटस्फोटाची अनेक हाय प्रोफाइल प्रकरणे समोर आली आहेत. पण यात सर्वाधिक चर्चेत राहिला तो अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस आणि त्यांची पत्नी मॅकन्झी बेजोस यांचा घटस्फोट. यामध्ये मॅकन्झीला पोटगी म्हणून दिलेली रक्कम सर्वाधिक होती.

27

२०१९ मध्ये जेफ बेजोस आणि त्यांची पत्नी मॅकन्झी हे विभक्त झाले. यानंतर मॅकन्झीला २.६ लाख कोटी रुपये मिळाले. घटस्फोटानंतर जेफ बेझोस यांची एकूण संपत्तीही कमी झाली.

37

पतीपासून विभक्त झाल्यानंतर मॅकन्झी जगातील सर्वात श्रीमंत चौथी महिला बनली होती. जेफ बेझोस १२० बिलियन अमेरिकन डॉलरच्या मालमत्तेसह जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत आहेत.

47

घटस्फोट झाल्यानंतरही जेफ बेझोस हे सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत होते. आता ते ११८ अब्ज डॉलर्स इतक्या मालमत्तेसह ते जगातील श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत.

57

जेफ बेझोस यांनी मॅकन्झीसोबत मिळून एका गॅरेजमध्ये ई कॉमर्स कंपनी एमेझॉनची स्थापना केली होती. जेफ बेझोस आणि मॅकन्झी यांचे लग्न १९९३ मध्ये झाले होते.

67

मॅकन्झी यांना घटस्फोटानंतर जेफ बेझोस यांच्याकडून ३८ अब्ज डॉलर्सचे ४ टक्के शेअर्स मिळाले होते. यानंतर हा घटस्फोट जगातला सर्वात महागडा घटस्फोट ठरला होता.

77

जेफ बेझोस यांच्यापासून वेगळं झाल्यानंतर मॅकन्झीने मार्च २०२१ मध्ये सिएटलमधील एका शाळा शिक्षकाशी दुसरं लग्न केलं होतं. मॅकन्झी आता दुसऱ्या पतीपासूनही वेगळं होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

  • FIRST PUBLISHED :