आयकर कायद्याच्या कलम 80D अंतर्गत करदाते स्वत: आश्रित मुलं, जोडीदार आणि पालकांसाठी प्रतिबंधात्मक तपासणीवर 5,000 रुपयांपर्यंतच्या कपातीचा दावा करू शकतात. त्याच वेळी, टॅक्सपेयर्स जीवन विमा पॉलिसी अंतर्गत मिळालेल्या रकमेवर कपातीचा दावा करू शकतो. ज्यामध्ये अशा पॉलिसीमध्ये बोनस म्हणून वाटप केलेल्या रक्कमेचा समावेश असतो. तसंच काही अटींच्या अधीन राहून कलम 10(10D) अंतर्गत करातून सूट मिळते.
तुम्ही आयकर कायद्याच्या कलम 80C ते 80U अंतर्गत मुले, पालक आणि इतर आश्रितांवर केलेल्या खर्चासाठी कपातीचा दावा करू शकता. तुम्ही भाड्याच्या घरात राहात असाल तर, तुम्ही आयकर कायद्याच्या सेक्शन 10 (13A) अंतर्गत HRAवर टॅक्स सूट मागू शकता. तुम्ही HRA वर या सूटचा दावा करू शकता.
तुम्ही पोस्ट ऑफिस बचत योजनांवर मिळणाऱ्या व्याजावर एका आर्थिक वर्षात 3,500 रुपये (वैयक्तिक खात्यांच्या बाबतीत) आणि7,000 रुपये (संयुक्त खात्यांच्या बाबतीत) कपातीचा दावा करू शकता.
इंडिव्हिज्युअल टॅक्सपेयर्स, आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत मुलांच्या शिक्षणासाठी भरलेल्या ट्यूशन फीसवर कपातीचा दावा करू शकतात. मात्र, यासाठी काही नियम आणि मर्यादा आहेत. यासोबतच, तुम्ही आयकर कायद्याच्या कलम 80E अंतर्गत शैक्षणिक कर्जावरील व्याजावर कटोतीचा दावा करू शकता.
लिव्ह ट्रॅव्हल कंसेशन: तुम्ही इन्कम टॅक्सच्या कलम 10(5) अंतर्गत काही अटींच्या अधीन राहून रजेवर प्रवास करताना झालेल्या खर्चासाठी लिव्ह ट्रॅव्हल कंसेशन सूटचा दावा देखील करू शकता.
राष्ट्रीय पेन्शन योजना: तुम्ही कलम 80CCD (1B) अंतर्गत NPS मध्ये केलेल्या योगदानासाठी 50,000 रुपयांपर्यंतच्या अतिरिक्त कपातीचा दावा करू शकता. नवीन कर प्रणालीमध्ये, नियोक्त्याचे NPS, सेवानिवृत्ती किंवा EPF मध्ये 7.5 लाख रुपयांपेक्षा जास्तीचे योगदान करपात्र आहे. परंतु तुम्ही संचित व्याज आणि एनपीएसमध्ये नियोक्त्याच्या योगदानावर कपातीचा दावा करू शकता.