आयआरसीटीसी पर्यटकांसाठी विविध टूर पॅकेजेस देत असते. या टूर पॅकेजच्या माध्यमातून प्रवासी स्वस्तात प्रवास करतात आणि पर्यटनालाही चालना मिळते. आता IRCTC ने काश्मीरसाठी टूर पॅकेज आणले आहे. या टूर पॅकेजद्वारे प्रवासी काश्मीरला भेट देऊ शकतात.
हे टूर पॅकेज 5 दिवस आणि 6 रात्रीचे आहे. या टूर पॅकेजचे नाव Enchanting Kashmir असे आहे. IRCTC च्या या टूर पॅकेजमध्ये प्रवासी गुलमर्ग, पहलगाम, श्रीनगर आणि सोनमर्गला भेट देतील.
या दौऱ्याची सुरुवात नवी दिल्ली विमानतळावरून होणार आहे. येथून पर्यटक श्रीनगरला पोहोचू शकतात. या टूर पॅकेजच्या माध्यमातून प्रवासी काश्मीरला जाणार असून त्यांना अनेक सुविधा मिळणार आहेत. श्रीनगरमध्ये उतरल्यानंतर पर्यटक हॉटेलमध्ये जातील आणि त्यानंतर त्यांना मुघल गार्डन्सची सैर करुन आणण्यात येईल.
पर्यटक संध्याकाळी मुघल गार्डनला भेट देतील. त्यानंतर ते हॉटेलमध्ये जेवण करतील. त्यानंतर हे पर्यटक सोनमर्गकडे रवाना होतील. सोनमर्ग समुद्रसपाटीपासून 2,800 मीटर उंचीवर आहे. येथे प्रवासी थजवास ग्लेशियरलाही भेट देऊ शकतात.
हे टूर पॅकेज मे महिन्यात सुरू होईल आणि जूनपर्यंत चालेल. या टूर पॅकेजच्या तारखा 5 मे 2023, 20 मे 2023, 27 मे 2023, 28 मे 2023, 03 जून 2023, 10 जून 2023, 11 जून 2023 आणि 12 जून 2023 आणि 12 जून 2023 असतील.
या टूर पॅकेजमध्ये प्रवाशांना एकट्याने प्रवास करण्यासाठी 48,740 रुपये भाडे द्यावे लागणार आहे. जर तुम्ही या टूर पॅकेजमध्ये दोन लोकांसोबत प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रति खर्च 32,030 रुपये भाडे द्यावे लागेल. तीन लोकांसह प्रवास करण्यासाठी, तुम्हाला प्रति व्यक्ती 31,010 रुपये भाडे द्यावे लागेल.
या टूर पॅकेजमध्ये तुमची मुलं सोबत असतील आणि त्यांच्यासाठी बेड घेतल्यास तुम्हाला 28,010 रुपये भाडे द्यावे लागेल. मुलासाठी बेड न घेतल्यास 24,260 रुपये भाडे द्यावे लागेल. या टूर पॅकेजमध्ये पर्यटक हाऊसबोटीत रात्रभर मुक्काम करतील आणि दल लेकमध्ये शिकारा राईडही करतील. या टूर पॅकेजमध्ये प्रवाशांना ट्रॅव्हल इन्शुरन्सही दिला जाणार आहे.