पर्यटनाला चालना देण्यासाठी, IRCTC वेळोवेळी टूर पॅकेज लाँच करत असते. या पॅकेजेस अंतर्गत पर्यटकांना देश-विदेशात फिरण्याची संधी मिळते. नुकतंच IRCTC ने तुमच्यासाठी पृथ्वीवरील स्वर्ग म्हटल्या जाणार्या काश्मीरचं टूर पॅकेज आणलंय. या पॅकेजअंतर्गत तुम्हाला पाटणा येथून विमानाने काश्मीरला नेले जाईल.
5 रात्री आणि 6 दिवसांचे हे पॅकेज 20 सप्टेंबर 2023 पासून सुरू होईल. या दौऱ्यात तुम्हाला श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग आणि पहलगाम येथे जाण्याची संधी मिळेल.
25 सप्टेंबर रोजी तुम्हाला पाटणा येथून सकाळी 08.40 वाजता फ्लाइट मिळेल. यानंतर तुम्ही 14.55 वाजता श्रीनगर विमानतळावर पोहोचाल आणि तुमचा काश्मीरचा अद्भुत प्रवास सुरू होईल.
टूर पॅकेजसाठी दर वेगवगेळे असतील. हे प्रवाशाने निवडलेल्या ऑक्यूपेंसीनुसार असतील. तुम्ही या पॅकेज अंतर्गत एकट्यासाठी बुकिंग करत असाल तर तुम्हाला 40,450 रुपये खर्च करावे लागतील. 2 लोकांसाठी बुकिंग केल्यास तुम्हाला प्रति व्यक्ती 36,310 रुपये खर्च करावे लागतील. 3 लोकांच्या बुकिंगवर तुम्हाला प्रति व्यक्ती 35,110 रुपये खर्च करावे लागतील.
5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलासाठी, बेडसह 27,700 रुपये आणि बेडशिवाय 25,340 रुपये चार्ज आहे.