NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / IRCTC देतेय दुबई फिरण्याची संधी, कमी खर्चात मिळणार 'या' सुविधा

IRCTC देतेय दुबई फिरण्याची संधी, कमी खर्चात मिळणार 'या' सुविधा

तुम्ही या मार्चमध्ये परदेशात प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर IRCTC तुमच्यासाठी एक उत्तम हवाई टूर पॅकेज घेऊन आले आहे. IRCTC ने दुबईसाठी टूर पॅकेजेस लॉन्च केलेय.

15

तुम्ही होळीनंतर परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर IRCTC तुमच्यासाठी एक उत्तम टूर पॅकेज घेऊन आले आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीचा फेरफटका मारण्यासाठी नेले जाईल.

25

IRCTC च्या या टूर पॅकेजमध्ये, बुर्ज खलिफा व्यतिरिक्त, तुम्हाला म्युझिकल फाउंटन शो, वाळवंटातील डेझर्ट सफारी, दुबईचे अनेक मोठे मॉल, डोव्ह क्रूझ टूर, अबू धाबी सिटी टूर आणि फेरारी वर्ल्डला भेट देण्याची संधी मिळेल.

35

IRCTC ने दुबईसाठी हवाई टूर पॅकेज लॉन्च केलेय. ही ट्रिप लखनऊपासून सुरू होईल जिथून तुम्हाला थेट विमानाने दुबईला नेले जाईल. त्याचा कालावधी 5 दिवस आणि 4 रात्रीचा असेल. ट्रिप 11 मार्च ते 15 मार्चपर्यंत असेल. या पॅकेजच्या खास वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊया.

45

या IRCTC टूर पॅकेजमध्ये, तुमच्यासाठी दुबईला जाण्या-येण्याच्या फ्लाइटच्या तिकिटांसह तेथे राहण्यासाठी थ्री स्टार हॉटेलची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण या सर्व गोष्टींचा या पॅकेजमध्ये समावेश आहे. दरवर्षी भारतातून मोठ्या संख्येने लोक दुबईला भेट देण्यासाठी जातात. तुम्हाला बुर्ज खलिफा पाहायचा असेल आणि डेझर्ट सफारीचा आनंद घ्यायचा असेल, तर तुम्ही या पॅकेजद्वारे बुकिंग करू शकता.

55

तुम्ही या टूर पॅकेज अंतर्गत 2 ते 3 लोकांसाठी बुकिंग केल्यास प्रत्येकी 85100 रुपये भाडे असेल. दुसरीकडे, जर तुम्ही एकट्याने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यासाठी 101,800 रुपये खर्च करावे लागतील. या पॅकेजमध्ये मुलांसाठी 84,400 रुपये भाडे ठरवण्यात आले आहे. तुम्ही हे पॅकेज आयआरसीटीसी कार्यालयात जाऊन किंवा अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन बुक करू शकता.

  • FIRST PUBLISHED :