NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / आता कमी बजेटमध्ये करा लडाखची सैर! IRCTC देतेय खास संधी

आता कमी बजेटमध्ये करा लडाखची सैर! IRCTC देतेय खास संधी

तुम्हाला प्रवासाची आवड असेल, तर भारतीय रेल्वेचे IRCTC वेळोवेळी पर्यटकांसाठी विविध प्रकारचे टूर पॅकेज घेऊन येत असते.

16

दरवर्षी लाखो पर्यटक लेह-लडाखला भेट देतात. तुम्हालाही उन्हाळ्याच्या सुट्टीत या सुंदर ठिकाणांना भेट द्यायची असेल, तर आम्ही तुम्हाला येथे IRCTC च्या टूर पॅकेजची माहिती देत ​​आहोत.

26

हे पॅकेज महाराष्ट्रात मुंबईपासून सुरू होणार आहे. या पॅकेजद्वारे तुम्ही 6 जून, 20 जून, 27 जून, 3 जुलै, 10 जुलै, 17 जुलै आणि 24 जुलै रोजी लेह-लडाखचा प्रवास करू शकता.

36

या पॅकेजमध्ये तुम्हाला लेह, Sham Valley, Leh, Nubra,Turtuk, Pangong अशा अनेक अद्भुत ठिकाणांना भेट देता येईल.

46

तुम्ही मुंबईहून लेहला जाल. यानंतर तुमचा पुढचा प्रवास सुरू होईल. या पॅकेजमध्ये तुम्हाला रात्रीच्या मुक्कामासाठी हॉटेलची सुविधा मिळेल.

56

यासोबतच तुम्हाला नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाची सुविधा मिळेल. यासोबतच तुम्हाला सर्वत्र जाण्यासाठी नॉन एसी बसची सुविधाही मिळणार आहे.

66

हे टूर पॅकेज 7 दिवस आणि 6 रात्रीचे आहे. यामध्ये तुम्हाला जाणे, येणे, राहणे, खाणे अशा अनेक सुविधा अगदी कमी दरात मिळतील. या टूर पॅकेजमध्ये, तुम्हाला एकट्याने प्रवास करण्यासाठी 57,900 रुपये, दोन लोकांसाठी प्रतिव्यक्ती 52,800 रुपये आणि तीन लोकांसाठी प्रति व्यक्ती 50,900 रुपये मोजावे लागतील.

  • FIRST PUBLISHED :