NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Investment Tips: एफडी प्रमाणे व्याज देतात 'या' सरकारी योजना, पाहा पूर्ण लिस्ट!

Investment Tips: एफडी प्रमाणे व्याज देतात 'या' सरकारी योजना, पाहा पूर्ण लिस्ट!

सध्याच्या काळात लोकांकडे गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, पण तरीही देशातील मोठी लोकसंख्या केवळ सरकारी योजनांवरच विश्वास ठेवते.

18

सोशल मीडियाच्या युगात लोकांमध्ये फायनेंशियल माहिती वाढत आहे. अशा परिस्थितीत सरकार देशातील प्रत्येक वर्ग आणि वयोगटासाठी अनेक योजना सुरू करत असते.

28

आज आम्ही तुम्हाला अनेक प्रकारच्या सरकारी योजनांची माहिती देत ​​आहोत. ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही 8 टक्क्यांहून अधिक व्याजदर मिळवू शकता. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.

38

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट अंतर्गत, सरकार ग्राहकांना 7.7 टक्के व्याजदर देत आहे. यामध्ये तुम्ही एकूण 5 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्ही 1,000 रुपयांपासून ते 100 च्या मल्टीपलमध्ये कितीही रक्कम योजनेमध्ये गुंतवू शकता.

48

सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत सरकार जमा राशीवर 8 टक्के व्याजदर देत आहे. तुम्ही हे खाते 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीसाठी उघडू शकता, ज्यामध्ये दरवर्षी 250 ते 1.5 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात.

58

पोस्ट ऑफिसच्या मंथली इनकम योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला 7.4 टक्के व्याजदर मिळू शकतो. या योजनेत एकूण 5 वर्षांसाठी सिंगल खात्यात 9 लाख रुपये आणि जॉइंट अकाउंटमध्ये 15 लाखांपर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते.

68

महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये गुंतवणूक करुन महिलांना 7.5 टक्के पर्यंत व्याज मिळू शकते. सरकारने सुरू केलेली ही नवीन योजना आहे.

78

किसान विकास पत्र या पोस्ट ऑफिसच्या आणखी एका योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 7.5 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळू शकतो. यामध्ये गुंतवलेली रक्कम 115 दिवसांत दुप्पट होईल.

88

ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणुकीवर 8.2 टक्क्यांपर्यंत मोठं व्याज मिळत आहे. यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त 30 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता.

  • FIRST PUBLISHED :