चॅटिंगसाठी आपण सर्वजण व्हॉट्सअॅप वापरतो. पण तुम्हाला माहीत आहे का की गरज पडल्यास आता तुम्ही व्हॉट्सअॅपच्या माध्यमातूनही कर्ज घेऊ शकता. ते कसं मिळतं हे आज आपण पाहणार आहोत.
IIFL फायनान्स आपल्या ग्राहकांना WhatsApp द्वारे 10 लाख रुपयांपर्यंतचे व बिजनेस लोन मिळवण्याची सुविधा देत आहे. यामध्ये कर्जासाठी अर्ज करण्यापासून ते मनी ट्रान्सफरपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल माध्यमातून केली जाईल.
IIFL फायनान्ससह, तुम्ही 24x7 एंड-टू-एंड डिजिटल लोन सुविधा मिळवू शकता. हे भारतातील सर्वात मोठ्या रिटेल NBFC (NBFC) पैकी एक आहे, जे स्मॉल इंडस्ट्रीला बिझनेस लोनची सुविधा उपलब्ध करुन देते.
WhatsApp द्वारे कर्ज घेण्यासाठी, तुम्हाला AI-bot ने विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. कर्ज घेण्याची संपूर्ण प्रक्रिया पेपरलेस असते. यासाठी तुम्हाला फक्त 9019702184 वर "Hi" पाठवावा लागेल.
मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. जर तुमच्या अर्जातील सर्व डिटेल्स बरोबर असतील तर तुम्हाला काही वेळातच कर्जासाठी अप्रूव्हल मिळते आणि लोनची रक्कम तुमच्या खात्यात ट्रान्सफर केली जाते.