NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / ट्रेनमध्ये सामान पार्सल पाठवायचेय? मग 'हे' नियम तुम्हाला माहिती असायलाच हवेत

ट्रेनमध्ये सामान पार्सल पाठवायचेय? मग 'हे' नियम तुम्हाला माहिती असायलाच हवेत

एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपण ट्रेनचा वापर करतो. यासोबतच आपलं सामान पार्सल करण्यासाठी देखील आपण ट्रेनचा वापर करत असतो. याचे नियम काय आहेत याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

15

भारतीय रेल्वेमधून लाखो लोक प्रवास करत असतात. कारण रेल्वे ही सर्वसामान्यांना परवडणारी आणि सुविधाजनक असते. प्रवास करण्यासोबतच आपलं साहित्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी देखील रेल्वे फायदेशीर ठरते. ज्यावेळी आपण एका शहरातून दुसऱ्या शहरात शिफ्ट होत असतो तेव्हा ट्रेनच्या माध्यमातून स्वस्तात साहित्य शिफ्ट केलं जाऊ शकतं. याची नेमकी प्रोसेस काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

25

रेल्वेच्या माध्यमातून तुम्ही लगेज किंवा पार्सलच्या रुपात आपलं साहित्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी डिलीव्हर करु शकता. लगेज म्हणजे तुम्ही प्रवासादरम्यान स्वतःचं साहित्य स्वतःसोबतच घेऊन जात आहात.

35

पार्सलच्या रुपातही या साहित्याची डिलिव्हरी करु शकता. पार्सलमध्ये तुम्हाला तुमच्या साहित्यासोबतच प्रवास करण्याची गरज नसते.

45

ट्रेनच्या माध्यमातून आपलं साहित्य पार्सल करण्यासाठी सर्वात आधी जवळच्या रेल्वे स्टेशनवर जा. तिथे तुम्हाला पार्सल काउंटरवरुन सर्व माहिती घ्यावी लागेल. यानंतर पॅकेजवर आपलं नाव, पत्ता आणि साहित्य ज्या स्टेशनवर पाठवायचं आहे त्याविषयी माहिती लिहा.

55

यानंतर फॉर्वर्डिंग लेटर भरुन फीस जमा करावी लागेल. यानंतर पावती मिळेल ती घ्यावी लागेल. तुम्हाला साहित्य कुठे पार्सल करायचं आहे आणि त्याचं वजन किती यावर त्याचे पैसे ठरवले जातील. तुम्ही तुमचं सामान अडव्हान्समध्ये देखील बुक करु शकता. ट्रेन सुटण्याच्या अर्धा तासपूर्वीही साहित्य बुक केलं जाऊ शकतं.

  • FIRST PUBLISHED :