NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / ट्रेनमध्ये विविध कोट्यातून मिळतं कन्फर्म तिकीट! असा घेता येईल फायदा

ट्रेनमध्ये विविध कोट्यातून मिळतं कन्फर्म तिकीट! असा घेता येईल फायदा

भारतीय रेल्वेमध्ये विविध कोट्यांतर्गत तिकिटं बुक केली जातात. बहुतेक प्रवाशांना केवळ तत्काळ, महिला आणि अपंग कोट्यातील प्रवाशांची माहिती असते. प्रवाशांची इच्छा असल्यास ते इतर कोट्यातूनही तिकीट बुक करू शकतात. चला तर मग जाणून घेऊया कोणकोणत्या कोट्यातून बुक करता येतात तिकीटे...

18

आरामदायी रेल्वे प्रवासासाठी कन्फर्म तिकीट आवश्यक असतं. तुम्ही लांबचा प्रवास करत असाल तर हे गरजेचं असतंच. मात्र लांबलचक वेटिंग लिस्टमुळे रेल्वे तिकीट सहज कन्फर्म होत नाही. त्यामुळे अनेक प्रवासी तत्काळ कोट्यातून तिकीट काढतात.

28

याशिवाय लेडीज आणि सीनियर सिटीझन कोट्यातून बुकिंग केले जाते. हे सर्व कोटा आहेत ज्यांची माहिती IRCTC वेबसाइटवर उपलब्ध आहे. पण भारतीय रेल्वेमध्ये असे अनेक कोटा आहेत, ज्यांच्या मदतीने कन्फर्म तिकीट मिळू शकते.

38

भारतीय रेल्वेमध्ये सुमारे 19 प्रकारचे कोटे आहेत. यातील बहुतेक लोक जनरल कोटा आणि तत्काळ कोट्यात तिकीट घेतात. याशिवाय, व्हीआयपी कोटा, लेडीज कोटा, ज्येष्ठ नागरिक कोटा, एचओ म्हणजेच मुख्यालय किंवा उच्च अधिकारी यासह इतर अनेक कोटे आहेत. त्यांच्या मदतीने तुम्ही कन्फर्म तिकीट कसं मिळवू शकता हे जाणून घेऊया.

48

व्हीआयपी कोटा : खासदार किंवा माजी खासदारांना रेल्वेत या कोट्याअंतर्गत तिकीट मिळते. केंद्र किंवा राज्य सरकारचे मंत्री, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि आमदारही या कोट्यातून प्रवास करू शकतात.

58

लेडीज कोटा - हा कोटा एकट्याने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी किंवा 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी राखीव आहे. काही गाड्यांमध्ये, सेकेंड सीटिंग(2S) आणि स्लीपर क्लास (SC) मध्ये महिला प्रवाशांसाठी 6 बर्थ निश्चित केले आहेत. बुकिंगच्या वेळी जर महिला कोट्यात बर्थ उपलब्ध असेल तर तुम्ही थेट सीट बुक करू शकता.

68

अपंग कोटा- दिव्यांगजन कोटा शारीरिकदृष्ट्या विकलांग लोकांसाठी राखीव आहे. त्यांना प्रवासासाठी 2 बर्थ दिले आहेत. खालचा बर्थ अपंग व्यक्तीसाठी आहे आणि शेजारील सीट त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्या सहप्रवाशासाठी आहे.

78

संरक्षण अधिकार्‍यांसाठी संरक्षण कोटा रिझर्व्ह असतो. या कोट्यातून बुक केलेली तिकिटे बहुतेक वेळा ट्रान्सफरसाठी, घरी जाण्यासाठी किंवा सुट्टीनंतर ड्युटी जॉईन करण्यासाठी वापरली जातात.

88

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (NREGA) द्वारे प्रमाणित 18-45 वर्षे वयोगटातील बेरोजगार प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेमध्ये युवा कोटा आहे. या सूटचा लाभ घेण्यासाठी तिकीट बुकिंग दरम्यान मनरेगा प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. याशिवाय सामान्य प्रवासी इतर कोट्याचाही लाभ घेऊ शकतात, मात्र त्यासाठी रेल्वे कोट्याशी संबंधित नियमांचे पालन करावे लागेल.

  • FIRST PUBLISHED :