NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Railway Rules: चालत्या ट्रेनमधून मोबाईल पडला तर काय करावं? एका क्लिकवर घ्या जाणून

Railway Rules: चालत्या ट्रेनमधून मोबाईल पडला तर काय करावं? एका क्लिकवर घ्या जाणून

Railway Rules: अनेकदा चालत्या ट्रेनमधून मोबाईल किंवा पर्स पडते. अशा वेळी टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्ही तुमचा मोबाईल फोनकिंवा पर्स पुन्हा मिळवू शकता.

15

ट्रेनमध्ये प्रवास करताना फोन वापरणे ही एक सामान्य गोष्ट आहे. मात्र हे करताना अनेक वेळा मोबाईल फोन किंवा पर्स इत्यादी महत्त्वाच्या वस्तू रेल्वे रुळावर पडतात. अशा परिस्थितीत लोक खूप अस्वस्थ होतात. कारण अनेकदा लोक बँकिंग डिटेल्सपासून ते आयडीपर्यंतची सर्व माहिती फोनमध्येच सेव्ह करून ठेवतात. अशा परिस्थितीत अनेक अडचणी येतात. या समस्येवर मात करण्यासाठी रेल्वेने काही नियम केलेय. या नियमांचे पालन करून तुम्ही तुमचा हरवलेला फोन किंवा पर्स परत मिळवू शकता.

25

चुकूनही ओढू नका चेन : मोबाईल फोन रेल्वे रुळावर पडला की ट्रेन थांबवण्यासाठी लोक चेन पुलिंग सुरू करतात. परंतु हे करणे टाळले पाहिजे कारण हा दंडनीय गुन्हा आहे. रेल्वेच्या नियमांनुसार केवळ आपत्कालीन परिस्थितीतच चेन पुलिंग करता येते. सामान पडल्यास किंवा खाली पडल्यास प्रवाशांना चेन पुलिंग करता येत नाही. मग नेमकं काय करावं हे जाणून घेऊया.

35

मोबाईल फोन कसा मिळवायचा : तुमचा मोबाईल फोन किंवा पर्स रेल्वे रुळावर पडली असेल तर सर्वप्रथम रुळाच्या बाजूला असलेल्या खांबावर पिवळ्या आणि काळ्या रंगात लिहिलेला नंबर नोट करा. यानंतर, तुमचा फोन कोणत्या दोन रेल्वे स्थानकांदरम्यान पडला आहे ते शोधा. यासाठी तुम्ही टीटीई किंवा इतर प्रवाशांच्या मोबाईल फोनची मदत घेऊ शकता.

45

यानंतर, रेल्वे पोलिस दलाच्या हेल्पलाइन क्रमांक 182 किंवा रेल्वे हेल्पलाइन क्रमांक 139 वर कॉल करून, तुमचा मोबाइल फोन किंवा सामान गायब झाल्याची माहिती द्या.

55

या दरम्यान तुम्ही तुमच्या पोल नंबरची माहिती आरपीएफला द्यावी. या माहितीमुळे रेल्वे पोलिसांना तुमचं सामान शोधणं सोपं होईल. यासोबतच तुमचा मोबाईल फोन मिळण्याची शक्यता अनेक पटींनी वाढेल. यानंतर, पोलिस तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी पोहोचतील आणि तुमचा मोबाईल फोन जमा करतील. पोलिस केवळ प्रयत्न करतात हे लक्षात ठेवा. जर तुमचा मोबाईल कोणी नेला असेल तर तुम्हाला तो परत मिळू शकणार नाही.

  • FIRST PUBLISHED :