NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांकडे किती संपत्ती? पाहा पहिला नंबर कोणाचा

देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांकडे किती संपत्ती? पाहा पहिला नंबर कोणाचा

दरवर्षी लाखो भाविक देशातील प्रसिद्ध मंदिरांमध्ये दर्शनासाठी जातात आणि कोट्यवधी रुपये दान देतात. देणगीच्या बाबतीत, देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांच्या यादीत अनेक प्रसिद्ध सिद्धस्थळांचा समावेश आहे. चला तर मग जाणून घेऊया त्यांना किती दान येतं.

16

भारताला मंदिरांचा देश असेही म्हणतात. कारण येथे ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असलेली अनेक प्राचीन मंदिरे आहेत. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देशभरात अनेक प्रसिद्ध आणि सिद्ध मंदिरे आहेत. दरवर्षी देश-विदेशातील कोट्यवधी भाविक या मंदिरांमध्ये पूजा आणि दर्शनासाठी येतात आणि कोट्यवधी रुपयांची देणगी देतात.

26

केरळमधील तिरुवनंतपुरम येथे असलेले पद्मनाभस्वामी मंदिर हे देशातील सर्वात श्रीमंत मंदिर मानले जाते. द्रविड शैलीत बांधलेल्या या प्राचीन मंदिराची देखरेख त्रावणकोरच्या पूर्वीच्या राजघराण्याकडून केली जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंदिराच्या 6 तिजोरींची एकूण संपत्ती 20 अरब डॉलर आहे. मंदिराच्या गर्भगृहात भगवान विष्णूची एक मोठी सुवर्ण मूर्ती विराजमान आहे.

36

आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर हे भारतातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हे मंदिर भगवान वेंकटेश्वराला समर्पित आहे जे भगवान विष्णूचे अवतार मानले जातात. मीडिया रिपोर्ट्सनुसार तिरुपती बालाजी मंदिराला दरवर्षी 600 कोटी रुपयांपेक्षा जास्त देणग्या मिळतात.

46

महाराष्ट्रातील शिर्डी येथे असलेल्या साईबाबांची कीर्ती देशात आणि जगभर पसरली आहे. येथे येणारे भाविक दरवर्षी सोने आणि रोख रक्कम दान करतात. विविध रिपोर्ट्सनुसार, मंदिरात 380 किलो सोने, 4,428 किलो चांदी आहे. गेल्या वर्षी 2022 मध्ये श्री साईबाबा संस्थान ट्रस्टला 400 कोटी रुपयांहून अधिक देणगी मिळाली होती.

56

जम्मू-काश्मीरमधील कटरा येथे असलेले माता वैष्णो देवी मंदिर खूप प्रसिद्ध आहे. असे मानले जाते की, ते सुमारे 700 वर्षांपूर्वी ब्राह्मण पुजारी पंडित श्रीधर यांनी बांधले होते. जगभरातून लाखो लोक दरवर्षी येथे दर्शनासाठी येतात. काही रिपोर्ट्सनुसार, माँ वैष्णो देवी ट्रस्टला दरवर्षी भक्तांकडून 500 कोटी रुपये देणगी म्हणून मिळतात.

66

मुंबईत असलेल्या सिद्धिविनायक मंदिराची ख्याती दूरवर आहे. विशेष म्हणजे बॉलिवूड स्टार्सपासून ते बडे उद्योगपती येथे दर्शनासाठी येतात आणि कोट्यवधींची देणगी देतात. या मंदिराला वर्षाला सुमारे 125 कोटींची देणगी मिळते.

  • FIRST PUBLISHED :