मुंबई, 5 जून : तुम्ही जर ICICI बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. बँकेने आपल्या मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट म्हणजेच MCLR मध्ये सुधारणा केली आहे. बँकेचे नवीन MCLR दर 1 जून 2023 पासून लागू झाले आहेत.
ICICI बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, ओव्हरनाइट टेन्योरसाठी बँकेचा एमसीएलआर रेट 8.35 टक्के आहे. एका महिन्याच्या कालावधीसाठी, MCLR रेट 8.50 टक्क्यांवरून 8.35 टक्क्यांवर कमी केला आहे.
बँकेने महिन्यांचा MCLR 8.55 टक्क्यांवरून 8.40 टक्क्यांवरून 15 बेस पॉइंटने कमी केलाय. बँकेने 6 महिने आणि एक वर्षाच्या कालावधीसाठी MCLR 5 bps ने वाढवून अनुक्रमे 8.75 टक्के आणि 8.85 टक्के केला आहे.
MCLR वाढल्याने टर्म लोनवरील EMI वाढण्याची अपेक्षा आहे. बहुतेक कंज्यूमर लोन एक वर्षाच्या मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेटच्या आधारावर असतात. अशा परिस्थितीत MCLR वाढल्यामुळे वैयक्तिक कर्ज, वाहन आणि गृह कर्ज महाग होऊ शकते.
MCLR म्हणजे काय? : MCLR ही भारतीय रिझर्व्ह बँकेने विकसित केलेली एक पद्धती आहे. ज्याच्या आधारे बँका कर्जासाठी व्याजदर ठरवतात. त्याआधी सर्व बँका बेस रेटच्या आधारे ग्राहकांसाठी व्याजदर निश्चित करत असत.