गुगल मॅपमध्ये ऑफलाइन नेव्हिगेशन पाहण्याची सुविधा बऱ्याच काळापासून आहे. पण, अनेकांना याची माहिती नाही. जर तुम्ही अशा भागात जात असाल जिथे तुम्हाला नेटवर्कची समस्या जाणवू शकते किंवा मोबाईल डेटा वाचवायचा असेल तर तुम्ही हे फीचर वापरू शकता.
Google Maps Offline फीचर वापरण्यासाठी, सर्वात आधी आपल्या फोनवर Google Maps ओपन करा. यानंतर, स्क्रीनच्या टॉप राइट कॉर्नरवरुन प्रोफाइलवर टॅप करा.
यानंतर तुम्हाला मेनूमधून Offline maps वर टॅप करावं लागेल. यानंतर तुम्हाला 'Select Your Own Map' बटणावर टॅप करावे लागेल. त्यावर टॅप करताच तुम्हाला एका ब्लू बॉक्समध्ये मॅप दिसेल.
यानंतर, तुम्ही झूम इन किंवा झूम आउट करून तुमच्या आवडीचा एरिया सेलेक्ट करु शकता. एरिया सेलेक्ट करण्यासाठी तुम्हाला ही पद्धत कामी येईल. याशिवाय तुम्हाला सर्चचा ऑप्शन मिळणार नाही.
यानंतर, तुम्हाला स्क्रीनच्या बॉटममध्ये Download बटण दिसेल. यासोबतच तुम्हाला मॅपची साइज किती आहे हे देखील सांगितले जाईल. तुमच्या फोनमध्ये तेवढी स्पेस फ्री असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला फक्त डाउनलोड बटणावर टॅप करायचे आहे.
त्यानंतर तुम्ही डाउनलोड केलेला मॅप अगदी सहजपणे ऑफलाइन पद्धतीने वापरण्यास सक्षम असाल. येथे तुम्ही डायरेक्शन्स सर्चही करु शकता.