NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / 'या' पिकातून करा लाखोंची कमाई, लागवडीचा खर्च फक्त 20 हजार; दुष्काळग्रस्त भागातही येते पीक

'या' पिकातून करा लाखोंची कमाई, लागवडीचा खर्च फक्त 20 हजार; दुष्काळग्रस्त भागातही येते पीक

आज आम्ही तुमच्यासाठी एक मस्त बिझनेस आयडिया घेऊन आलो आहोत. तुम्ही अगदी कमी पैशात हा बिझनेस सुरु करु शकता. यामधून तुम्ही कमीत कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त पैसे काढू शकता.

16

तुम्हाला कमी पैसे गुंतवून तुमचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय फायदेशीर बिझनेस आयडिया घेऊन आलो आहोत. हा लेमनग्रास शेतीचा व्यवसाय आहे. या शेतीतून तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. ही शेती करण्यासाठी तुम्हाला 15 हजार ते 20 हजार रुपये खर्च करावे लागतील.

26

याचे बियाणे शेतात एकदा पेरले जाते आणि पीक वर्षातून चार वेळा काढले जाते. गवताची लांबी दर 3 महिन्यांनी 7 फुटांनी वाढते. गवताची लांबी 7 फूट झाल्यावर ते कापून मूळ तसचं राहू दिलं जातं. बाजारात याच्या तेलाला खूप मागणी आहे. बाजारात लेमन ग्रास तेल 1500 रुपये प्रति लिटरने विकले जाते.

36

लेमन ग्रासपासून काढलेल्या तेलाला बाजारात मोठी मागणी आहे. लेमन ग्रासपासून काढलेले तेल कॉस्मेटिक्स, साबण, तेल आणि औषधे बनवणाऱ्या कंपन्या वापरतात. यामुळे बाजारात चांगला भाव मिळतो. या शेतीची खास गोष्ट म्हणजे दुष्काळग्रस्त भागातही याची लागवड करता येते. लेमनग्रासच्या लागवडीतून केवळ एक हेक्‍टरमधून तुम्हाला एका वर्षात 4 लाख रुपयांपर्यंतचा नफा मिळू शकतो.

46

लेमन ग्रासची लागवड खूप फायदेशीर आहे. हे करण्यासाठी प्रथम बेड तयार केला जातो. बेड तयार केल्यानंतर लेमन ग्रासच्या तयार बिया शेतात लावल्या जातात. 15 दिवसांच्या आत हे पाण्याने झाकले जाते. खत फवारणी आणि कीटकनाशक फवारणी 1 महिन्यात अचूकपणे केली जाते. जेणेकरून गवतामध्ये किड लागणार नाही. लेमन ग्रासच्या शेतात 30 दिवसांपर्यंत पाणी टाकले जाते. त्यामुळे ते पाणी मुळापर्यंत पोहोचते. त्यामुळे त्याचे मूळ अधिक दाट होतात. लेमन ग्रास लावण्यासाठी सर्वोत्तम वेळ फेब्रुवारी ते जुलै दरम्यान आहे. एकदा लागवड केल्यानंतर सहा ते सात वेळा कापणी केली जाते. कापणी वर्षातून तीन ते चार वेळा केली जाते.

56

लेमन ग्रास लावल्यानंतर 3 ते 5 महिन्यांनी त्याची पहिली काढणी केली जाते. एक एकर जमिनीच्या लागवडीतून 5 टनांपर्यंत लेमन ग्रासची पानं काढता येतात. तसे, तुम्ही त्याची लागवड 15000 ते 20 हजार रुपयांमध्ये सुरू करू शकता, परंतु जर तुमचे बजेट थोडे जास्त असेल तर तुम्ही सुरुवातीलाच मशीन बसवू शकता. तुम्ही 2 ते 2.5 लाख रुपयांमध्ये मशीन सेट करू शकता.

66

लेमन ग्रासच्या लागवडीमुळे तुम्हाला लवकरच उत्पन्न मिळू लागेल. एक क्विंटल लेमन ग्रासपासून एक लिटर तेल तयार होते. बाजारात त्याची किंमत 1 हजार ते 1500 रुपयांपर्यंत आहे. म्हणजेच पाच टन लेमन ग्रासपासून तुम्हाला किमान 3 लाख रुपये नफा मिळू शकतो. लेमन ग्रासची पाने विकूनही तुम्ही चांगली कमाई करू शकता. बिहारचे रौनक कुमार आणि रमण कुमार हे दोन भाऊ एकत्र लेमन ग्रासची लागवड करतात आणि त्यापासून चहा बनवतात आणि देशभरात पुरवतात. यातून त्यांना दरमहा 4 ते 5 लाख रुपये मिळत आहेत.

  • FIRST PUBLISHED :