NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / प्रॉपर्टी खरेदी करतानाच नाही तर विकतानाही लक्षात ठेवा या गोष्टी, मिळेल चांगला भाव!

प्रॉपर्टी खरेदी करतानाच नाही तर विकतानाही लक्षात ठेवा या गोष्टी, मिळेल चांगला भाव!

घर खरेदी करताना तुम्ही अनेक प्रकारची कागदपत्रे, एरिया आणि सुविधा तपासतात. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही चांगली प्रॉपर्टी खरेदी करू शकता. आता तुम्हाला प्रॉपर्टी विकायची असली तरी या गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. याच्या मदतीने तुम्हाला जे काही घर किंवा जमीन विकायची आहे, ती पटकन विकली जाईल. यासोबतच तुम्हाला चांगला नफाही मिळेल.

16

मालमत्तेची डागडुजी : घरामध्ये काही दुरुस्तीची गरज असेल तर ती करून घ्या. भिंतीवरील रंग, ओलसरपणा, पाण्याचे लीकेज, इलेक्ट्रीसिटीचं काम, साफसफाई आणि पेस्ट कंट्रोल करुन घ्या. यामुळे तुमच्या मालमत्तेचा दर 1-2 लाख रुपयांनी वाढेल.

26

सर्व टॅक्स किंवा बिल भरुन टाका : प्रॉपर्टी टॅक्स, कोणत्याही प्रकारचं बिल आणि मेंटेनेंस चार्ज फेडून टाका. घरावर कर्ज असेल तर तेही पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. मात्र, असे झाले नाही तरी काळजी करण्यासारखे काही नाही. घरातील कोणत्याही प्रकारचा वाद मिटवा.

36

कागदपत्रे जवळ ठेवा : प्रॉपर्टीची विक्री करण्यापूर्वी ओनरशिप डॉक्यूमेंट, सेल डीड, जीपीए, लीज डीड, टायटल पेपर, प्रॉपर्टी टॅक्सची पावती, वीज-पाणी बिल इत्यादी तयार ठेवा. PNG वरून गॅस पुरवठा होत असेल तर त्याचे बिल ठेवा.

46

प्रॉपर्टीचा योग्य रेट पाहून घ्या : प्रॉपर्टीचे सध्याचे बाजारातील दर काय आहेत ते पाहून घ्या. यामध्ये ब्रोकर तुम्हाला मदत करू शकतात. तुम्हाला ब्रोकरकडे जायचे नसले तरी, तुम्ही जमिनीचा दर आणि नंतर बांधकामाची किंमत यामध्ये तुमचा नफा लावून एकरकमी रक्कम तयार करू शकता.

56

मालमत्तेचे मार्केटिंग करा : तुमच्या मालमत्तेबद्दल चांगल्या गोष्टींचे मार्केटिंग करा. जसे की ठिकाण, वाहतुकीचे साधन, मुख्य रस्ता, रुग्णालय, शाळा, रेल्वे स्टेशन किंवा विमानतळापासूनचे अंतर जाहिरातीत लिहा. प्रॉपर्टीच्या मार्केटिंगसाठी तुम्ही ऑनलाइन, सोशल मीडिया, तोंडी किंवा जाहिरातीची मदत घेऊ शकता. जर घर सोसायटीत असेल तर मंदिर, जिम, पूल, कम्युनिटी सेंटर इत्यादी वैशिष्ट्यांबद्दल नक्कीच सांगा.

66

कितीत विकायचे - तुम्ही तुमच्या बाजूने प्रॉपर्टीची सर्वोत्तम किंमत सांगा आणि नंतर खरेदीदाराच्या रिस्पॉन्सची वाट पाहा. तुम्ही सांगितलेल्या रकमेच्या जवळपासच त्यांचा रिस्पॉन्स असेल तर त्यांना शक्य तितक्या तुमच्या रकमेपर्यंत आणण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, जर तुम्ही 50 लाख रुपये सांगितले आणि समोर 45 लाखांची ऑफर आहे, तर ही डील 47-48 लाखांमध्ये होऊ शकते. म्हणूनच आपल्या बाजूने किंमत थोडी जास्त असल्यास ते चांगले आहे.

  • FIRST PUBLISHED :