NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Money Tips: ईएमआयच्या ओझ्यामुळे हैराण झालात? या ट्रिक्सने कमी करु शकता भार

Money Tips: ईएमआयच्या ओझ्यामुळे हैराण झालात? या ट्रिक्सने कमी करु शकता भार

How to Reduce Burden of EMI: आपण घर, जमीन, कार किंवा इतर अनेक कारणांसाठी कर्ज घेतो. कर्ज जितके मोठे असेल तितका EMI जास्त असेल. अनेकदा या EMI मुळे लोकांचे मासिक बजेट बिघडते. अशा वेळी, तो कसा तरी ईएमआयचा भार कमी करण्याचा पर्याय शोधतो. हे करणे शक्य आहे ते कसं हे आपण पाहूया.

16

व्याजदराची तुलना: तुम्हाला कर्जाचा EMI कमी ठेवायचा असेल, तर तुम्हाला सर्वप्रथम वेगवेगळ्या बँका आणि वित्तीय संस्थांचे व्याजदर पाहावे लागतील. कदाचित तुमची नियमित बँक तुम्हाला महाग कर्ज देत आहे आणि तेच कर्ज तुम्हाला इतर कुठून तरी स्वस्तात मिळू शकते.

26

दीर्घ परतफेडीचा कालावधी- तुम्ही या पद्धतीने कर्जाची परतफेड केल्यास एकूण कर्जाची किंमत जास्त असू शकते. परंतु तुमच्यावर दर महिन्याला EMI चा जास्त भार पडणार नाही. जास्त रीपेमेंट कालावधीमुळे EMI कमी असेल.

36

क्रेडिट स्कोअर- स्वस्त कर्ज मिळवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे चांगला क्रेडिट स्कोअर. 750 च्या वर क्रेडिट स्कोअर चांगला मानला जातो. यावरुन दिसतं की, तुम्ही तुमची मागील देणी वेळेत भरली आहेत. बँक तुमच्यावर विश्वास ठेवते आणि कमी व्याजदराने तुमचे कर्ज मंजूर करते.

46

लोन रीफायनेंस करणे - याचा अर्थ असा की, तुम्ही दुसऱ्या कर्जदाराकडून नवीन कर्ज घेऊन जुन्या कर्जाची भरपाई करत आहात. जर तुम्हाला 50 ते 100 बेसिस पॉइंट्स म्हणजेच दोन्ही कर्जांमध्ये 0.50 ते 1 टक्के लाभ मिळाला तरच तुम्ही हे केले पाहिजे.

56

प्रीपेमेंट- तुमच्याकडे वेळोवेळी काही एकरकमी पैसे जमा झाले असतील, तर त्यातून कर्जाचे प्रीपेमेंट करा. तुम्ही दरवर्षी कर्जाच्या शिल्लक रकमेच्या 5% प्रीपेमेंट केले तर 20 वर्षांचे कर्ज 12 वर्षांत पूर्ण होऊ शकते.

66

ओव्हरड्राफ्ट सुविधा- हे काहिसे प्रीपेमेंटसारखेच आहे. अनेक बँका होम लोनवर ओव्हरड्राफ्ट सुविधा देतात. यामध्ये, तुम्हाला एक अकाउंट दिले जाते ज्यामध्ये तुम्ही तुमच्या मासिक EMI वर पैसे जमा करता. याला होम लोन प्रीपेमेंट म्हणून पाहिले जाते. मात्र, गरज पडल्यास त्यातून पैसेही काढता येतात.

  • FIRST PUBLISHED :