NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / नेटवर्क प्रॉब्लममुळे कंटाळलाय? जुना नंबर या सोप्या पद्धतीने करा पोर्ट, घसरबसल्या मिळेल नवं सिम

नेटवर्क प्रॉब्लममुळे कंटाळलाय? जुना नंबर या सोप्या पद्धतीने करा पोर्ट, घसरबसल्या मिळेल नवं सिम

तुम्ही तुमच्या सध्याच्या टेलिकॉम ऑपरेटरच्या सर्व्हिसवर खूश नसाल किंवा तुम्ही भारतात अशा ठिकाणी शिफ्ट झाला आहात जिथे तुमच्या सध्याच्या कंपनीचे नेटवर्क चांगले नाही. अशा वेळी, तुम्हाला तुमचा सध्याचा नंबर दुसर्‍या टेलिकॉम कंपनीला पोर्ट करायचा असेल. तर याच्या सोप्या स्टेप्स आपण पाहूया.

16

सर्वप्रथम, तुम्हाला कोणता टेलिकॉम ऑपरेटर सिलेक्ट करायचा आहे ते ठरवा. सध्या, Jio, Airtel, Vi आणि BSNL सारख्या मोठ्या टेलिकॉम कंपन्या भारतात सेवा देतात.

26

यानंतर, तुम्हाला त्या नंबरवरून PORT XXXXXXXXXX (10 अंकी मोबाइल नंबर) लिहून 1900 वर संदेश पाठवावा लागेल. आम्ही यासाठी तुमच्या फोन नंबरवर एसएमएससाठी रिचार्ज असणे आवश्यक आहे.

36

यानंतर, तुम्हाला 1901 नंबरवरून 8-डिजिटवाला UPC कोड म्हणजेच युनिक पोर्टिंग कोड मिळेल. भारतातील काही ठिकाणे वगळता, हा UPC कोड 4 दिवसांसाठी व्हॅलिड असतो.

46

यानंतर तुम्हाला त्या नेटवर्क ऑपरेटरच्या जवळच्या स्टोअर किंवा ऑफिसमध्ये जावं लागेल. मग त्यांना आवश्यक कागदपत्रे जसे की UPC कोड आणि अॅड्रेस प्रूफ सारखे डॉक्यूमेंट्स द्यावे लागतील. तेथे तुम्हाला एक सिम दिले जाईल. अनेक कंपन्या आता सिमची होम डिलिव्हरी देखील करतात. यासाठी, तुम्हाला त्यांच्या साइट किंवा अॅपला भेट देऊन फोन नंबर पत्ता टाकावा लागेल. यानंतर, कंपनीतील एक व्यक्ती तुमच्या घरी येईल आणि तुमच्याकडून कागदपत्र आणि यूपीसी कोड घेईल आणि सिम दिल्यानंतर निघून जाईल. येथे तुम्हाला नवीन प्लॅनसाठी पैसेही द्यावे लागतील.

56

यानंतर, पोर्टिंगची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सुमारे दोन दिवस किंवा चार दिवस लागतात. काही विशेष परिस्थितीत ही वेळ जास्त असू शकते. कारण या काळात नवीन ऑपरेटरकडून जुन्या ऑपरेटरला बिल पेमेंटच्या बॅकग्राउंड व्हेरिफिकेशनसाठी रिक्वेस्ट पाठवली जाते.

66

तुमची विनंती मंजूर होताच. नेटवर्क स्विचची वेळ आणि दिवस नवीन ऑपरेटरद्वारे तुम्हाला मॅसेज पाठवून सांगेल. त्यानंतर फोनमध्ये सिग्नल दिसणे बंद होताच, नवीन ऑपरेटरने दिलेले सिम फोनमध्ये टाकावे लागते.

  • FIRST PUBLISHED :