NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / फसवणुकीपासून सावधान! अशा ओळखा 500 च्या बनावट नोटा

फसवणुकीपासून सावधान! अशा ओळखा 500 च्या बनावट नोटा

सध्या बाजारात बनावट नोटा मोठ्या प्रमाणात आढळतात. यामुळे अनेकांची फसवणूक होते. मात्र काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही बनावट नोटा ओळखू शकता. याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत.

17

बनावट नोटांना आळा घालण्यासाठी आरबीआय विविध पावले उचलत आहे. 2020 मध्ये या दिशेने पाऊल टाकत केंद्रीय बँकेने 500 रुपयांच्या नव्या नोटा जारी केल्या. रंग, आकार आणि थीमच्या बाबतीत या जुन्या नोटांपेक्षा वेगळ्या होत्या.

27

या नोटेमध्ये ज्या ठिकाणी सिक्योरिटी फीचर्स देण्यात आली होती. ती देखील जुन्या नोटेपेक्षा वेगळी होती. आरबीआयने 500 रुपयांच्या असली नोटा ओळखण्यासाठी काही पद्धती सांगितल्या होत्या. नवीन 500 च्या नोटेवरील 17 गोष्टींवरुन तुम्ही तिची पारख करु शकता. या 17 गोष्टी कोणत्या हे आपण 5 पॉइंट्समध्ये जाणून घेऊया...

37

खऱ्या नोटेची पहिली ओळख म्हणजे, 500 हा अंक पारदर्शक पद्धतीने लिहिलेला आहे. यानंतर, खाली एक गुप्त प्रतिमा आहे ज्यामध्ये 500 लिहिले आहे. तिसरे म्हणजे 500 हे देवनागरीतही लिहिले गेले आहे. चौथी ओळख म्हणजे मध्यभागी असलेले महात्मा गांधींचे चित्र.

47

पाचवी ओळख भारत आणि India ही सूक्ष्म अक्षरात लिहिली आहे. सहावी ओळख म्हणजे नोटेच्या मध्यभागी असलेला शिफ्ट विंडो सिक्योरिटी थ्रेड ज्यामध्ये भारत आणि आरबीआय लिहिलेले आहे. नोट तिरपी केल्यावर त्याचा रंग हिरव्याऐवजी निळा दिसतो.

57

सातवी ओळख म्हणजे गव्हर्नरच्या स्वाक्षरीसह गॅरंटी वाक्य आणि महात्मा गांधींच्या चित्राच्या उजवीकडे आरबीआय चिन्ह. 8वी ओळख म्हणजे रिकाम्या जागेत लपलेला महात्मा गांधींचा फोटो आणि 500 चा लपवलेला वॉटरमार्क. 9वी ओळख म्हणजे चढत्या क्रमाने नोटेच्या सर्वात डावीकडे आणि खालच्या उजव्या बाजूला असलेली संख्या. 10ओळख म्हणजे. डाव्या बाजूने सर्वात खाली रंग बदलणाऱ्या शाईने ₹500 असं लिहिलंय. Mutual Fund: लाखो रुपयांची गरज आहे? मग असे करा प्लानिंग, केवळ 5 वर्षात जमा होतील 50 लाख रुपये!

67

11वी ओळख म्हणजे उजव्या बाजूला अशोक स्तंभाचे चिन्ह. 12वी ओळख विशेषत: दृष्टिहीनांसाठी आहे - महात्मा गांधी आणि अशोक स्तंभाचे उंचावलेले पोर्ट्रेट, उजवीकडे मायक्रोटेक्स्टमध्ये ₹500 असलेले वर्तुळाकार ओळख चिन्ह आणि 5 एंगुलर ब्लीड लाइन.

77

13वी ओळख म्हणजे डाव्या बाजूला नोट छापण्याचे वर्ष, 14वी ओळख म्हणजे स्वच्छ भारताचा घोषवाक्य असलेला लोगो. 15वी ओळख म्हणजे लॅग्वेज पॅनल, 16वी ओळख म्हणजे लाल किल्ल्याची आकृती आणि 17वी ओळख म्हणजे देवनागरीत लिहिलेले 500. अचानक पैशांची गरज भासली तर 'हा' पर्याय आहे बेस्ट, सहज मिळेल कर्ज

  • FIRST PUBLISHED :