कर्ज देणार्या बँका आणि इतर वित्तीय संस्था लोन अॅप्लीकेशनचे मूल्यांकन अनेक पॅरामीटर्सच्या आधारे करतात. यामध्ये लोन अप्लाय करणाऱ्याचं क्रेडिट, मंथली इन्कम, जॉब प्रोफाइल इत्यादींचा समावेश आहे. सावकाराने ठरवून दिलेल्या निकषांची पूर्तता न करणारे अर्ज नाकारले जातात. कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत जेणेकरून तुमचं लोन अॅप्लीकेशन रिजेक्ट केला जाणार नाही आणि तुम्हाला लगेच लोन मिळेल.
क्रेडिट स्कोअर: क्रेडिट स्कोर लोन मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ज्यांचा क्रेडिट स्कोअर 750 किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांना कर्जदाता प्राधान्य देतात. म्हणूनच तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला बनवणे आणि ते कायम ठेवणे महत्त्वाचे आहे.
क्रेडिट रिपोर्ट रिव्ह्यू: क्रेडिट ब्युरो तुमचे क्रेडिट स्कोरची गणना लेंडर्स आणि क्रेडिट कार्ड इश्यू करणाऱ्या संस्थांच्या क्रेडिट रिपोर्टच्या आधारावर करतात. तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये कोणतीही चुकीची माहिती जोडली गेल्याने तुमच्या क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो. म्हणूनच बँकेत कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्ही क्रेडिट रिपोर्टची समिक्षा करणे आवश्यक आहे. काही चूक असेल तर ती दुरुस्त करावी.
योग्य बँकेची निवड : वेगवेगळ्या बँकांचे व्याज दर, प्रोसेसिंग चार्जेस आणि लोन अवधीमध्ये फरक असतो. लोनसाठी अप्लाय करण्यापूर्वी त्यांची तुलना करा आणि तुमची गरज आणि क्षमता लक्षात घेऊन कर्जासाठी प्लाय करा, मग तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता वाढेल.
री-पेमेंट वेळेची निवड : लोन एप्लीकेशन में लोन फेडण्याचा कालावधी खूप महत्त्वाचा असतो. तुमचे सर्व आवश्यक मासिक खर्च केल्यावर तुमच्याकडे किती पैसे शिल्लक आहेत हे कर्ज देणारी संस्था पाहते. फक्त त्या आधारावर, तुम्ही किती वेळेत कर्जाची परतफेड करू शकाल याचे मुल्यांकन कर्जदाता कंपनी करते. त्यामुळे कर्ज परतफेडीचा कालावधी अत्यंत काळजीपूर्वक निवडा.