NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Special FD: एचडीएफसी, एसबीआय की आयसीआयसीआय बँक? ज्येष्ठ नागरिकांना FD वर कुठे मिळतंय जास्त व्याज?

Special FD: एचडीएफसी, एसबीआय की आयसीआयसीआय बँक? ज्येष्ठ नागरिकांना FD वर कुठे मिळतंय जास्त व्याज?

FD for Senior Citizen: आजही ज्येष्ठ नागरिक बँकेच्या एफडी योजनेत पैसे गुंतवण्यास प्राधान्य देतात. ग्राहकांच्या सोयीसाठी अनेक बँकांनी स्पेशल एफडी स्किम लॉन्च केल्या आहेत.

17

स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी खास एफडी योजना आणल्या आहेत. कोणत्या बँकेच्या FD वर तुम्हाला गुंतवणुकीवर जास्त इंट्रेस्ट रेट मिळेल हे पाहूया.

27

HDFC बँकेने ज्येष्ठ नागरिक ग्राहकांसाठी HDFC सीनियर सिटीझन केयर स्कीम लॉन्च केली आहे. ही स्किम कोरोनाच्या वेळी सुरू करण्यात आली होती. जर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुमच्याकडे 7 जुलै 2023 पर्यंत वेळ आहे.

37

HDFC सिनियर सिटीझन केअर स्कीम अंतर्गत, ज्येष्ठ नागरिकांना 5 ते 10 वर्षांपर्यंतच्या डिपॉझिट स्किमवर 7.75 टक्के व्याज मिळत आहे. तर बँक ज्येष्ठ नागरिकांना 35 आणि 55 महिन्यांच्या एफडीवर 7.70 आणि 7.75 टक्के व्याजदर देत आहे.

47

एसबीआयने ज्येष्ठ नागरिकांसाठी वी केअर एफडी स्किम सुरू केली आहे. या स्किमअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सामान्य ग्राहकांपेक्षा 30 बेसिस पॉइंट अधिक मिळतात.

57

SBI V Care योजनेअंतर्गत, 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना 5 वर्षांच्या FD योजनेवर 7.50 टक्के व्याजदर मिळत आहे. दुसरीकडे, SBI च्या अमृत कलश योजनेअंतर्गत, ज्येष्ठ नागरिकांना 400 दिवसांच्या FD वर 7.60 टक्के व्याजदर मिळत आहे.

67

ICICI बँकेने सीनियर सिटीझन गोल्डन इयर एफडी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत ग्राहकांना सामान्य नागरिकांच्या तुलनेत 7.50 टक्के व्याजदर मिळत आहे.

77

ICICI बँकेच्या गोल्डन इयर एफडी योजनेअंतर्गत, तुम्हाला 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी 7.50 टक्के व्याजदराचा लाभ मिळेल.

  • FIRST PUBLISHED :