NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / गोल्ड खरेदी करताना फक्त हॉलमार्क नाही, तर बिलमधील 'या' गोष्टी करा चेक; अन्यथा होईल फसवणूक

गोल्ड खरेदी करताना फक्त हॉलमार्क नाही, तर बिलमधील 'या' गोष्टी करा चेक; अन्यथा होईल फसवणूक

Gold Shopping: सोन्याच्या दागिने खरेदी करताना त्यावरील हॉलमार्कवरुन ते शुद्ध आहे की नाही हे तपासलं जातं. पण फक्त हेच पुरेसं नाही. सोन्याचं बिलही पाहणं गरजेचं असतं. त्यात नेमकं काय पाहावं याविषयी सविस्तर आपण जाणून घेऊया.

16

तुम्हाला शुद्ध सोने खरेदीसाठी हॉलमार्किंगचे नियम तर आता माहितीच झाले असतील. हॉलमार्किंग शुद्ध सोन्याची निशाणी आहे. 6 एप्रिलपासून, फक्त अल्फान्यूमेरिक HUID चिन्हांकित दागिन्यांचीच विक्री करण्याची परवानगी आहे, त्यामुळे सोने खरेदी करताना तुम्ही हे तपासायला हवं. पण यासोबतच आणखी काही गोष्टी पाहणंही महत्त्वाचं असतं. तुम्ही सोनं खरेदी केल्यावर त्याचं बिल काळजीपूर्वक पाहिलंय का? सोनं खरेदी करताना, हॉलमार्क सोबतच बिलही तितकच महत्त्वाचं असतं.

26

ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) सोन्याची शुद्धता आणि बिलिंग यांसारख्या इतर नियमांसाठी नियम सेट करते. बीआयएस म्हणते की तुम्ही फक्त हॉलमार्क केलेले दागिने खरेदी करा आणि खरेदी केल्यानंतर ज्वेलर्सकडून ऑथेंटिक बिल किंवा पावती घेतली पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या खरेदीमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास, किंवा काही प्रकरण अडकले, कोणतीही तक्रार आली तर त्याची पावती असणे आवश्यक आहे.

36

BIS नुसार, तुमच्या बिलामध्ये हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची माहिती असली पाहिजे. वस्तूंची संख्या, त्यांचे वेगवेगळे वजन, कॅरेट माहिती, हॉलमार्क माहिती असावी.

46

तुमच्या बिलमध्ये आर्टिकलचं नाव, उदाहरणार्थ, तुम्ही अंगठी विकत घेतली असेल तर रिंग. तसेच त्याचे वजन, शुद्धता, जसे की ते 22 कॅरेट, 24 कॅरेट इ. यासोबत कॅरेटनुसार सोन्याचा सध्याचा दर, मेकिंग चार्जेस, हॉलमार्क चार्जेस आणि जीएसटी इत्यादी एकूणात समाविष्ठ केलेले असावे.

56

जर तुमच्या सोन्याच्या दागिन्यांमध्ये वेगळा स्टोन वगैरे असेल तर त्याची माहिती ज्वेलरला वेगळ्या बिलात द्यावी लागेल. दगड किती आहे, कोणता आहे, त्याचे वजन किती आहे, यासारखी माहिती असावी.

66

तुम्हाला सोन्याच्या शुद्धतेबद्दल शंका असल्यास, बीआयएस तुम्हाला त्याची शुद्धता तपासण्याची सुविधा देखील देते. तुम्ही कोणत्याही BIS समर्थित कोणत्याही असेइंग आणि हॉलमार्किंग सेंटरला (A&H सेंटर) भेट देऊन ते तपासू शकता. यासाठी तुम्हाला टेस्टिंग चार्ज भरावे लागेल. BIS ने या केंद्रांची यादीही जारी केली आहे.

  • FIRST PUBLISHED :