आज आपण Portable Mini Projector Color LED LCD बद्दल बोलत आहोत. ग्राहक सध्या Amazon वरून 2,990 रुपयांना हे खरेदी करू शकतात.
या प्रोजेक्टरची अनेक वैशिष्ट्ये आहेत. एकतर ते पोर्टेबल आहे. तसेच, ते साध्या स्क्रीन किंवा भिंतीवर 60-इंच स्क्रीन क्रिएट करु शकते. हे इतके लहान आहे की ते तळहातावर सहज बसते आणि पिशवीत ठेवून कुठेही नेले जाऊ शकते.
Amazon वर दिलेल्या माहितीनुसार, बाहेर प्रवास करताना पॉवर बँक वरून देखील चालवता येते. कंपॅटिबिलिटीविषयी बोलायचे तर, डेस्कटॉप, लॅपटॉप, स्मार्टफोन आणि टॅबलेट हे सर्व त्यात कनेक्ट केले जाऊ शकतात.
यासोबतच पेनड्राईव्ह, गेमिंग कन्सोल आणि हार्ड ड्राइव्हलाही जोडता येईल. विशेष म्हणजे हेडफोन्स किंवा होम थिएटरही यासोबत जोडले जाऊ शकतात.
ते जास्तीत जास्त 3 मीटर अंतरावरून वापरावे लागते आणि ते टेबलवर ठेवले जाते.तुम्हाला एखाद्या ठिकाणी मूव्ही पार्ट किंवा आउटडोर एंटरटेन्मेंट करायचं असेल तर त्याच्यासाठी हे खूप चांगले आहे.