भारताच्या शेजारील देश श्रीलंकेमध्ये फिरण्यासाठी अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत. टूरिज्मची या देशातील इकॉनॉमीवर महत्त्वाची भूमिका आहे. येथे 1 भारतीय रुपयाचे मूल्य 3.80 श्रीलंकन रुपया इतके आहे. अशा वेळी तुम्ही कमी खर्चातही आरामात प्रवास करू शकता.
तसं पाहिलं तर जपान हा एक विकसित देश आहे आणि अनेक बाबतीत भारताच्या पुढे आहे. पण त्याची करेंसी व्हॅल्यू भारतीय रुपयापेक्षा कमी आहे. 1 भारतीय रुपया 1.69 जपानी येन बरोबर आहे. अशा वेळी तुमच्या परदेश सहलीसाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
दक्षिण-पूर्व देशांपैकी एक असलेल्या इंडोनेशियामध्येही भारतीय लोकांना श्रीमंत असल्याची फिलिंग येऊ शकते. भारतीय रुपयाच्या तुलनेत इंडोनेशियन चलनाचे मूल्य खूपच कमी आहे. 1 भारतीय रुपया 183.26 इंडोनेशियन रुपयाच्या बरोबरीचा आहे.
व्हिएतनाम, त्याच्या भव्य समुद्रकिनाऱ्यासाठी ओळखला जाणारा देश आहे. विशेषतः ट्रॅव्हल ब्लॉगर्ससाठी एक अतिशय लोकप्रिय डेस्टिनेशन बनले आहे. 1 भारतीय रुपया 287.68 व्हिएतनामी डोंगच्या बरोबरीचा आहे. अशा वेळी तुम्ही इथे स्वस्तात जाऊ शकता.
कमी पैशात फिरण्यासाठी कंबोडिया देखील चांगला ऑप्शन आहे. 1 भारतीय रुपया 50.11 कंबोडियन रिएलच्या बरोबरीचा आहे. हिंदू धर्माशी संबंधित अनेक मान्यता इथे प्रचलित आहेत आणि अनेक मोठी मंदिरेही आहेत.