कोणत्याही बँकेत फिक्स्ड डिपॉझिट करणाऱ्यांना दरवर्षी फॉर्म जमा करावा लागतो. तुम्ही हा फॉर्म सबमिट न केल्यास बँका व्याजाच्या रकमेवर टीडीएस कापतात. पण कोणता फॉर्म , का आणि कधीपर्यंत सबमिट करायचा? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.
कोणते फॉर्म जमा करावे लागतील? : फिक्स्ड डिपॉझिट करणाऱ्यांना दोन फॉर्म सबमिट करावे लागतात. फॉर्म 15G आणि फॉर्म 15H दरवर्षी बँकेत किंवा जेथे FD केली जाते तिथे सबमिट करावे लागतात.
फॉर्म का भरावा लागतो? : प्रत्येक व्यावसायिक वर्षात मिळणारे व्याज एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त असेल, तर बँकेकडून व्याजाच्या रकमेवर TDS कापला जातो. तुमचा टीडीएस कापला जावा असे तुम्हाला वाटत नसेल तर तुम्ही हा फॉर्म सबमिट करा.
त्याची लिमिट काय आहे? : आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये, सामान्य नागरिकांसाठी व्याजाची लिमिट 10,000 रुपये होती आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही लिमिट 50,000 रुपये होती. यानंतर, ही लिमिट 2019-20 च्या व्यावसायिक वर्षासाठी 40,000 रुपये आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 50,000 रुपये होती. 2021-22 आणि 2022-23 साठीही हीच लिमिट आहे.
फॉर्म कधीपर्यंत सबमिट करायचे आहेत? : या संदर्भात एका बँकेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत हे फॉर्म कधीही सबमिट करता येतील. साधारणपणे, बँका त्यांच्या ग्राहकांना एप्रिल महिन्यातच हे फॉर्म जमा करण्याचा सल्ला देतात. ते वेळेवर जमा केले तर वर्षभर टेन्शन फ्री राहाल.
फॉर्म 15G म्हणजे काय? : इनकमवरील TDS टाळण्यासाठी फॉर्म 15G भरला जातो. त्यातही काही अटी आहेत. त्याच आधारे हा फॉर्म भरला जातो. हा फॉर्म 15G इन्कम टॅक्स अॅक्ट, 1961 च्या कलम 197A च्या अंडर सब सेक्शन 1 आणि 1(A) अंतर्गत एक डीक्लेरेशन फॉर्म आहे.
फॉर्म 15H काय आहे? : फॉर्म 15H हा इन्कम टॅक्स अॅक्ट, 1961 च्या अंडर सेक्शन 197A च्या अंडर सब सेक्शन 1(C) अंतर्गत एक डेक्लेरेशन फॉर्म असतो.