आम्ही तुम्हाला अशा अनेक आर्थिक कामांची माहिती देणार आहोत जे जून महिना संपण्यापूर्वी पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. तुम्ही ही कामं पूर्ण न केल्यास तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं.
जर तुम्ही अजून पॅन आणि आधार लिंक केले नसेल तर आजच हे काम लवकरात लवकर पूर्ण करा. पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी सरकारने 30 जून 2023 पर्यंत वेळ दिला आहे. या वेळेत तुम्ही हे काम पूर्ण केले नाही, तर तुमचा पॅन इनअॅक्टिव्ह केला जाईल.
तुम्हाला तुमचा आधार फ्री अपडेट करायचा असेल, तर लवकर करुन घ्या. UIDAI ने MyAadhaar पोर्टलवर 14 जूनपर्यंत आधार फ्रीमध्ये अपडेट करण्याची सुविधा दिली आहे. यानंतर तुम्हाला शुल्क भरावे लागेल.
EPFO पेन्शन धारकासाठी आर्थिक दृष्टिकोनातून जून महिना खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला अधिक पेन्शनसाठी अर्ज करायचा असेल तर हे काम 26 जून 2023 पर्यंत पूर्ण करा.
तुम्हाला SBI च्या स्पेशल FD स्कीममध्ये गुंतवणूक करायची असेल तर हे काम 30 जून 2023 पर्यंत पूर्ण करा. या योजनेचे नाव आहे SBI अमृत कलश योजना, ज्याद्वारे सामान्य लोकांना 400 दिवसांच्या FD वर 7.10 टक्के व्याजदर मिळत आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.6 टक्के व्याजदर मिळत आहे.
ग्राहकांना नवीन लॉकर अॅग्रीमेंटवर साइन करण्यासाठी RBI ने 31 डिसेंबर 2023 पर्यंत बँकांना वेळ दिला आहे. अशा स्थितीत बँकांना 50 टक्के ग्राहकांकडून 30 जून 2023 पर्यंत या करारावर साइन घ्यायची आहे.