NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / ताजमहलसारखा आहे हा शाही बंगला! किंमत पाहून व्हाल अवाक्, एक भारतीय खरेदी करण्याच्या तयारीत

ताजमहलसारखा आहे हा शाही बंगला! किंमत पाहून व्हाल अवाक्, एक भारतीय खरेदी करण्याच्या तयारीत

मार्बल पॅलेस, दुबईतील सर्वात महागड्या मालमत्तांपैकी एक आहे आणि आता हे विक्रीसाठी तयार आहे. यासाठी 1600 कोटी रुपयांची किंमत ठरवण्यात आली आहे. असं बोललं जातंय की, हा पॅलेस खरेदी करण्यात रस दाखवलेल्या 2 लोकांपैकी एक भारतीय आहे. ही प्रॉपर्टी 60,000 चौरस फुटांमध्ये पसरलेली आहे. यासोबतच त्याची मास्टर बेडरूम 4,000 स्क्वेअर फूट आहे.

16

जगामध्ये दुबाईतील लग्जरी प्रॉपर्टीची मागणी वाढलीये. आजकाल व्हर्सायमध्ये एक पॅलेस सारखं घर आहे, ज्याची किंमत 750 मिलियन दिरहम म्हणजेच 1,600 कोटी रुपये आहे. हे घर या परिसरातील सर्वात महागडे घर आहे. केवळ 5 बेडरूम असूनही, लोक हे घर विकत घेण्यास उत्सुक आहेत, कारण ते प्रतिष्ठित एमिरेट्स हिल्स परिसरात हे घर आहे.

26

60,000 चौरस फुटांमध्ये पसरलेल्या, या प्रॉपर्टीमध्ये मास्टर बेडरूमची साइज 4,000 चौरस फूट आहे. जो बहुतेक घरांच्या एकूण आकारापेक्षा जास्त आहे. ग्राउंड फ्लोरवर एंटरटेनमेंट आणि खाण्यापिण्यासाठी स्पेस आहे.

36

या घराची एक नाही तर अनेक वैशिष्ट्ये आहेत. यात 15-कार गॅरेज, 19 शौचालये, इनडोअर तसेच आउटडोअर पूल, दोन टेरेस, 80,000 लिटर पाणी असलेले कोरल रीफ एक्वैरियम आणि इलेक्ट्रिकल सबस्टेशन आहेत. इथून गोल्फ कोर्सचा थेट नजारा दिसतो.

46

या घरातील प्रत्येक गेस्ट रूम 1,000 चौरस फूट आहे. या बंगल्यात दुसरी मोठी बेडरुम ही 2,500 चौरस फूट आहे. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे 1000 फुटांवर एक चांगलं घर आपण बांधू शकतो. मात्र याची बेडरुमच यापेक्षा मोठी आहे.

56

या पॅलेससारख्या घराला "मार्बल पॅलेस" असे म्हणतात. कारण ते इटालियन संगमरवरी दगडाने बांधले आहे. ज्याची किंमत 80 ते 100 मिलियन दिरहम आहे. या प्रॉपर्टी संपत्ती Luxhabitat Sotheby's International Realty द्वारे विकली जात आहे. या घराच्या बांधकामाला सुमारे 12 वर्षे लागली आणि ती 2018 मध्ये पूर्ण झाली.

66

एमिरेट्स हिल्समधील इतर मालमत्तांच्या तुलनेत मार्बल पॅलेसची किंमत दुप्पट आहे. डीएनएच्या रिपोर्टनुसार, ब्रोकर कुणाल सिंह यांनी सांगितले की, जास्त किंमतीमुळे 3 आठवड्यात केवळ दोन लोकांनी हे घर पाहिले आहे. या ग्राहकांपैकी दुसरा एक भारतीय आहे ज्याची अमिराती हिल्समध्ये आधीच 3 घरे आहेत. दुबईचे प्रॉपर्टी मार्केट महागड्या किमतींसाठी जगभरात ओळखले जाते. येथे पाम जुमेरावरील प्रत्येक घर आणि बंगल्याच्या किमती कोट्यवधी रुपयांच्या घरात आहेत.

  • FIRST PUBLISHED :