देशात क्रेडिट कार्डचा वापर वाढतोय, त्यामुळे त्याच्या वापराची रिस्क देखील वाढतेय. जर तुम्ही त्याचा हुशारीने वापर केला तर त्याचा फायदा होतो. मात्र, त्याचा वापर बेजबाबदारपणे केल्यास तुम्ही कर्जाच्या सापळ्यात अडकू शकता. तुम्हीही वापरत असाल तर जाणून घ्या कोणत्या चुका महागात पडू शकतात.
एटीएममधून क्रेडिट कार्डद्वारे पैसे काढणे टाळावे. क्रेडिट कार्डमधून रोख रक्कम काढण्यासाठी क्रेडिट पीरियड उपलब्ध नाही. तुम्ही एटीएममधून पैसे काढता त्या दिवसापासूनच तुमच्या कार्डवर आकारला जाणारा व्याजदर सुरू होतो.
संपूर्ण क्रेडिट कार्ड लिमिट वापरणे टाळा. याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो. क्रेडिट कार्ड कंपन्या 30 टक्क्यांपेक्षा जास्त क्रेडिट युटिलायझेशन रेशो हे कर्जाचे लक्षण मानतात.
क्रेडिट युटिलायझेशन रेशो (CUR) चा क्रेडिट स्कोअरवर मोठा प्रभाव पडतो. तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड किती वापरता यावर तुमचे क्रेडिट युटिलायझेशन रेशो अवलंबून असते.
जेव्हा कार्डधारक फक्त मिनिमम अमाउंट ड्यू भरतात, तेव्हा त्यांना लेट पेमेंट चार्ज करण्याची आवश्यकता नसते. मिनिमम अमाउंट ड्यू ही यूजर्सच्या थकित बिलाची एक लहान टक्केवारी (सामान्यतः 5%) आहे. मात्र यामुळे तुमचे कर्ज झपाट्याने वाढवू शकते. कारण दररोज न भरलेल्या रकमेवर फायनेंस चार्ज आकारले जाते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, क्रेडिट कार्डवरील फायनेंस चार्ज सामान्यतः 40% प्रतिवर्ष पेक्षा जास्त असते.