सर्वात मोठी सरकारी बँक SBI ने आपल्या ग्राहकांना दर महिन्याला 5 वेळा एटीएममधून मोफत पैसे काढण्याची सुविधा दिली आहे. मात्र, मेट्रो शहरांसाठी ही मर्यादा केवळ तीन वेळाच आहे. पाच वेळा पैसे काढल्यानंतर, एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी 5 रुपये आणि इतर कोणत्याही बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी 10 रुपये आकारले जातील. एटीएममधून तुम्ही दररोज किमान 100 रुपये आणि जास्तीत जास्त 20 हजार रुपये काढू शकता.
पंजाब नॅशनल बँक देखील आपल्या ग्राहकांना मेट्रो शहरांमध्ये दर महिन्याला 3 वेळा मोफत पैसे काढण्याची आणि मेट्रो नसलेल्या शहरांमध्ये 5 वेळा मोफत पैसे काढण्याची सुविधा देते. यानंतर प्रत्येक पैसे काढल्यावर 10 रुपये चार्ज भरावे लागेल. या बँकेचे ग्राहक दररोज जास्तीत जास्त 25,000 रुपये काढू शकतात, तर गोल्ड आणि प्लॅटिनम सारखे कार्डधारक दररोज 50,000 रुपये काढू शकतात.
HDFC ही खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आपल्या ग्राहकांकडून नॉन-मेट्रो शहरांमध्ये पाच आणि मेट्रो शहरांमध्ये तीन वेळा काढण्यासाठी शुल्क आकारत नाही. यानंतर 21 रुपये आणि टॅक्स घेतला जातो. या बँकेतही कार्डनुसार दररोज 10 हजार ते हजार हजार रुपये काढता येतात. इंटरनॅशनल एटीएममधून पैसे काढण्यासाठी बँक प्रति ट्रांझेक्शन 125 रुपये पैसे वसूल करते.
ICICI, खाजगी क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी बँक, आपल्या ग्राहकांना मेट्रो शहरांमध्ये दर महिन्याला 3 वेळा मोफत पैसे काढणे आणि गैर-मेट्रो शहरांमध्ये 5 वेळा मोफत पैसे काढण्याची सुविधा देते. यानंतर बँक 21 रुपये आणि टॅक्स वसूल करते. तुम्ही बिगर ICICI बँकेच्या ATM मधून पैसे काढल्यास तुम्हाला 1000 रुपयांवर 5 रुपये आणि 25,000 रुपयांवर 150 रुपये द्यावे लागतील. या बँकेच्या एटीएममधून दररोज 50 हजार रुपये काढता येतात.
Axis बँकेचे ग्राहकही मेट्रो शहरांमध्ये दर महिन्याला 3 वेळा आणि नॉन-मेट्रो शहरांमध्ये 5 वेळा पैसे काढू शकतात. यानंतर, बँक प्रत्येक पैसे काढण्यावर 21 रुपये आणि टॅक्स वसूल करते. या बँकेचे ग्राहक एटीएममधून दररोज 40 हजार रुपयांपर्यंत काढू शकतात. खाजगी बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपेक्षा जास्त असते. जेणेकरून ग्राहकांना आकर्षित करता येईल.