तुम्ही बँकेकडून कर्ज घ्यायला गेलात तर साधारणपणे क्रेडिट स्कोअरचा उल्लेख केला जातो. क्रेडिट स्कोअर / CIBIL स्कोअर हे कर्जाची परतफेड करण्यासाठी एखाद्या व्यक्तीची क्रेडिट योग्यता मोजण्यासाठी एक महत्त्वाचे पॅरामीटर आहे.
तुमचा क्रेडिट स्कोअर खराब असेल तर कर्ज मिळण्यात खूप अडचणी येतात. जर क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज सहज मिळू शकते. तर, क्रेडिट युटिलायझेशन रेशोचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो. क्रेडिट युटिलायझेशन रेशो म्हणजे काय ते जाणून घेऊया
क्रेडिट युटिलायझेशन रेशो म्हणजेच CUR म्हणजे तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डची क्रेडिट मर्यादा एका महिन्यात किती वापरता. CUR चा क्रेडिट स्कोअरशी खूप संबंध आहे. तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड किती वापरता यावर तुमचा CUR अवलंबून आहे. तुम्ही जितके क्रेडिट कार्ड वापराल, तितका तुमचा CUR जास्त असेल.
उदाहरणार्थ, तुमच्या क्रेडिट कार्डवर 2 लाख रुपये क्रेडिट लिमिट आहे. जर तुम्ही यामधील 30,000 रुपये खर्च केले तर तुमचा CUR 15% होईल. क्रेडिट लिमिटचा जास्त वापर झाल्यामुळे क्रेडिट युटिलायझेशन रेशो वाढतो. चांगल्या क्रेडिट स्कोअरसाठी, क्रेडिट युटिलायझेशन रेशो 30% च्या खाली ठेवण्याचा सल्ला दिला जातो. यावरुन कळतं की, तुम्ही क्रेडिट कार्डवर जास्त अवलंबून नाही.
तुमच्या CUR ने 30 टक्क्यांचा आकडा ओलांडला तर तुमचा क्रेडिट स्कोअर खाली येऊ शकतो. कमी CUR राखण्यासाठी क्रेडिट लिमिट वाढवण्याचा सल्ला दिला जातो.