NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / क्रेडिट कार्डला बनवा तुमचं प्रॉफिट कार्ड! हे फायदे तुम्हाला माहितीय का?

क्रेडिट कार्डला बनवा तुमचं प्रॉफिट कार्ड! हे फायदे तुम्हाला माहितीय का?

अनेकांना क्रेडिट कार्डचा योग्य वापर कसा करायचा हे अजूनही माहिती नाही. तर तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डला कसं प्रॉफिट कार्ड बनवू शकता पाहा.

15

मुंबई: सध्या क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या वेगानं वाढत आहे. बऱ्याच ठिकाडी आपल्या वायफळ खर्चांसाठी देखील क्रेडिट कार्डचा वापर केला जातो. अनेकांना क्रेडिट कार्डचा योग्य वापर कसा करायचा हे अजूनही माहिती नाही. तर तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डला कसं प्रॉफिट कार्ड बनवू शकता पाहा.

25

क्रेडिट कार्डचा सर्वात मोठा फायदा म्हणजे जेव्हा जेव्हा आपण त्याद्वारे खरेदी करता तेव्हा आपल्याला पैसे देण्यासाठी ग्रेस पीरियड मिळतो. या काळात बँकेकडून व्याज आकारले जात नाही. हा ग्रेस पीरियड 18 दिवस ते 55 दिवसांपर्यंत असू शकतो.

35

जर तुम्हाला अचानक पैशांची गरज भासली तर ती गरज तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे पूर्ण करू शकता आणि ग्रेस पीरियड संपण्यापूर्वी ते पैसे विनाव्याज बँकेत परत करू शकता. नाहीतर त्यावर खूप मोठी पेनल्टी देखील तुम्हाला बसू शकते.

45

क्रेडिट कार्डचा योग्य वापर करून तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोअर तयार करू शकता. क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला कर्ज मिळणं सोपं होतं. क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी क्रेडिट कार्ड हा एक चांगला पर्याय आहे. याशिवाय क्रेडिट कार्डधारकांनाही अचानक गरज पडल्यास प्री-अप्रूव्ह्ड कर्ज सहज मिळते.

55

ज्या गोष्टी तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे एकरकमी किंमत देऊन खरेदी करू शकत नाही, त्या तुम्ही EMI वर घेऊन त्याचा EMI दर महिन्याला देऊ शकता. त्यामुळे तुम्हाला गरजेच्या वस्तू घेणंही सोपं होतं आणि एकरकमी रक्कम देण्याचा भार पडत नाही.

  • FIRST PUBLISHED :