NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / हे फुलांच नाही तर पैशांच झाड! कमी वेळेत मिळवता येईल बक्कळ पैसा

हे फुलांच नाही तर पैशांच झाड! कमी वेळेत मिळवता येईल बक्कळ पैसा

तुम्ही खेड्या पाड्यांमध्ये किंवा जंगलात पळसाचं झाड पाहिलं असेल. केशरी फुलांनी सजलेल्या झाडामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. याची शेती केली तर तुम्ही मालामाल होऊ शकता. ते कसं हे आज आपण जाणून घेणार आहोत.

15

आजकाल लोक पुन्हा शेतीकडे वळत आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्हीही शेतीसाठी जास्त कमाईचे पीक शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला एक खास आयडिया देतोय. पळसाच्या फुलांची लागवड करून तुम्ही बंपर कमवू शकता. हे फूल विविध नावांनी ओळखले जाते. या फुलाला इतर फुलांसारखा सुगंध नसला तरी अनेक गुण या फुलांमध्ये आढळतात. तुम्ही या फुलांची शेती करुन यशस्वी शेतकरी बनू शकता.

25

पळसाचं हे फुल त्याच्या सौंदर्यासाठी ओळखले जाते. या फुलाला उत्तर प्रदेश राज्याचे राज्य फूल म्हणूनही घोषित करण्यात आलेय. त्याला परसा, ढक, सु, किषक, सुक, ब्रह्मवृक्ष आणि वनाची ज्योत इत्यादी नावांनी संबोधले जाते. या फुलाची लागवड करून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता. त्याची लागवड कशी करायची ते जाणून घेऊया.

35

पळसाचं फूल अनेक गुणांनी परिपूर्ण आहे : पळसाची फुले त्यांच्या सेंद्रिय रंगांसाठी जगभर प्रसिद्ध आहेत. फुलांशिवाय त्याच्या बिया, पाने, साल, मुळे आणि लाकूड यांचाही वापर केला जातो. आयुर्वेदिक पावडर आणि त्यापासून बनवलेले तेलही चांगल्या दरात विकले जाते. या फुलाचा वापर होळीचे रंग बनवण्यासाठीही केला जातो. हे फूल चित्रकूट, माणिकपूर, बांदा, उत्तर प्रदेशातील महोबा आणि मध्य प्रदेशातील बुंदेलखंड येथे आढळते. त्याचबरोबर झारखंड आणि दक्षिण भारतातील काही भागातही या फुलांची लागवड केली जाते.

45

एकदा झाड लावा, आयुष्यभर कमवा : देशातील अनेक शेतकरी पळसाच्या फुलांची लागवड करून भरघोस कमाई करत आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत या फुलाच्या लागवडीत घट झाली आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला शेती करण्याची ही चांगली संधी आहे. पळसाचं रोप लावल्यानंतर 3-4 वर्षांनी फुले येण्यास सुरुवात होते. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही 1 एकर शेतात 50 हजार रुपये खर्चून पळस बागकाम करू शकता. एकदा लागवड केली की पुढील 30 वर्षांसाठी उत्पन्न निघेल.

55

पळस हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत: पळसाच्या झाडापासून मिळणारे सर्व काही गुणांनी भरपूर असते. ते अनेक प्रकारच्या रोगांवर देखील वापरले जाऊ शकते. तज्ज्ञांच्या मते नाकातून, कानातून किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून रक्तस्राव होत असल्यास पलाशच्या सालाचा काढा करून प्यायल्याने खूप फायदा होतो. याउलट पालाश डिंक साखरेत मिसळून दूध किंवा आवळ्याच्या रसात घेतल्याने हाडे मजबूत होतात.

  • FIRST PUBLISHED :