प्रत्येक पालकाला मुलांच्या भविष्याची चिंता असते. अशा वेळी, त्यांच्या जन्मानंतर लगेचच पालक त्यांच्या भविष्यासाठी थोडा-थोडा निधी गोळा करू लागतात. त्यांच्या शालेय शिक्षणानंतर त्यांना उच्च शिक्षणासाठी लागणारे पैसे पालक हे जमा करत असतात.
दरम्यान या सर्वांसाठी मोठी रक्कम गोळा करण्यासाठी अनेक वर्षे लागतात. परंतु जर तुम्ही चांगल्या योजनेत गुंतवणूक केली तर ते तुमच्यासाठी खूप सोपे होऊ शकते. दररोज 150 रुपयांची बचत करून, तुम्ही तुमच्या मुलाचे भविष्य वर्षानुवर्षे सुधारू शकता. LIC ची जीवन तरुण पॉलिसी तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी खूप फायदेशीर आहे.
एलआयसीच्या या पॉलिसी अंतर्गत, तुम्ही दररोज केवळ 150 रुपयांची बचत करून वर्षभरात 54000 रुपये वाचवू शकता. ही रक्कम एलआयसीच्या जीवन तरुण पॉलिसीसाठी प्रीमियम म्हणून जमा केली जाऊ शकते.
या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमचे मूल कमीत कमी तीन महिने आणि जास्तीत जास्त 12 वर्षांचे असणे आवश्यक आहे. तसेच, मुलाचे वय 20 वर्षे होईपर्यंत पॉलिसीमध्ये प्रीमियम भरले जातात. याशिवाय, मुलाचे वय 25 झाल्यानंतर त्याला पॉलिसीचे सर्व फायदे मिळतात.
LIC च्या जीवन तरुण पॉलिसी अंतर्गत, किमान विमा रक्कम 75 हजार रुपये असावी. कमाल मर्यादा नाही. 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलासाठी, पॉलिसीची मुदत 13 वर्षे आहे. त्याची किमान विमा रक्कम 5 लाख रुपये असावी.
एका वर्षात 54000 च्या प्रीमियमनंतर, आठ वर्षांनंतर 4,32,000 गुंतवणुकीवर एकूण 8,44,500 रुपये परतावा मिळतो. एकूण रकमेत 2,47000 बोनस आणि 97,000 लॉयल्टी बोनस ऑफर केले जातात.
प्रीमियम मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर भरला जाऊ शकतो.