NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / झिरो रिस्क, भरपूर रिटर्न! जबरदस्त परतावा हवाय तर हे लार्ज कॅप फंड्स आहेत बेस्ट

झिरो रिस्क, भरपूर रिटर्न! जबरदस्त परतावा हवाय तर हे लार्ज कॅप फंड्स आहेत बेस्ट

लार्ज कॅप म्युच्युअल फंड केवळ मोठ्या कंपन्यांमध्ये बाजार भांडवलाच्या दृष्टीने गुंतवणूक करतात. मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कमी चढ-उतार असतात. त्यामुळे लार्ज कॅप म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे तुलनेने कमी जोखमीचे असते असे मानले जाते. लॉग टर्म हे लार्ज कॅप फंड चांगले रिटर्न देतात.

18

सेबीच्या नियमांनुसार, लार्ज कॅप म्युच्युअल फंडांना त्यांच्या कॉर्पसपैकी 80% फक्त लार्ज कॅप स्टॉकमध्ये गुंतवणे आवश्यक आहे. जर आपण वार्षिक परताव्याबद्दल बोललो, तर 6 लार्ज कॅप फंडांनी गुंतवणूकदारांना सरासरी 14% वार्षिक नफा दिलाय.

28

लाइव्ह मिंटमधील रिपोर्टनुसार, निप्पॉन इंडिया लार्ज कॅप फंड 8 ऑगस्ट 2007 रोजी लॉज झाला. त्याने स्थापनेपासून 11.76% वार्षिक परतावा दिला आहे. या फंडाने लार्सन अँड टुब्रो, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि अॅक्सिस बँक यांसारख्या मोठ्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे.

38

SBI ब्लू चिप फंड 14 फेब्रुवारी 2006 रोजी लाँच करण्यात आला. लाँच झाल्यापासून, त्याचा वार्षिक सरासरी रिटर्न 11.55 टक्के आहे. लार्सन अँड टुब्रो, स्टेट बँक ऑफ इंडिया, ITC आणि इन्फोसिस हे काही प्रमुख शेअर्स आहेत ज्यात फंडाने गुंतवणूक केली आहे.

48

कॅनरा रोबेको ब्लूचिप इक्विटी फंड 20 ऑगस्ट 2010 रोजी लाँच करण्यात आला होता. त्याचा आतापर्यंतचा सरासरी वार्षिक रिटर्न 12.08 टक्के आहे. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एसबीआय आणि आयटीसी हे काही मोठे स्टॉक्स आहेत ज्यामंमध्ये या फंडाने पैसे लावले आहेत.

58

आदित्य बिर्ला सन लाइफ फ्रंटलाइन इक्विटी फंड 20 वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहे. आतापर्यंत या फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी 10.7% रिटर्न दिलाय. या फंडने एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि इन्फोसिस यांसारख्या मोठ्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक केलीये.

68

UTI निफ्टी 50 फंड मार्च 2000 मध्ये सुरू करण्यात आला. लाँच झाल्यापासून या फंडाचे सरासरी वार्षिक रिटर्न 11.04% आहे. UTI फंडाचे पैसे HDFC, IRCCI बँक इन्फोसिस आणि ITC सारख्या मोठ्या स्टॉक्समध्ये गुंतवले जातात.

78

HDFC इंडेक्स निफ्टी 50 फंड जुलै 2002 मध्ये सुरू करण्यात आला. त्याचा आतापर्यंतचा वार्षिक सरासरी परतावा 14.53 टक्के आहे. एचडीएफसी बँक, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या स्टॉक्समध्ये या फंडाने गुंतवणूक केली आहे.

88

(Disclaimer: येथे नमूद केलेले म्युच्युअल फंड हे आर्थिक सल्लागाराच्या सल्ल्यावर आधारित आहेत. तुम्हाला यापैकी कोणत्याहीमध्ये गुंतवणूक करायची असल्यास, प्रथम सर्टिफाइड गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या. तुमच्या नफा किंवा तोट्यासाठी News18 जबाबदार राहणार नाही.)

  • FIRST PUBLISHED :