NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Bank Strike : पुढील आठवड्यात दोन दिवस बँकांचा संप! जाणून घ्या तारखा

Bank Strike : पुढील आठवड्यात दोन दिवस बँकांचा संप! जाणून घ्या तारखा

SBI Bank Strike: आपल्या विविध मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने 30 जानेवारीपासून दोन दिवसांच्या संपाची हाक दिली आहे.

16

मुंबई, 27 जानेवारी: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या ग्राहकांना सूचित केले आहे की, युनियन फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने 30-31 जानेवारी रोजी पुकारलेल्या आगामी दोन दिवसांच्या बँक संपामुळे त्यांच्या शाखांमधील बँकिंग सेवा प्रभावित होऊ शकतात.

26

बँक व्यवस्थापनाने म्हटले की, इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) ने माहिती दिली आहे की, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने संपाची नोटीस जारी केली आहे. AIBEA, AIBOC, NCBE, AIBOA, BEFI, INBEF आणि INBOC सारख्या UFBU शी संलग्न संघटनांनीही संपाला पाठिंबा देण्यासाठी नोटीस बजावली आहे. त्यामुळे बँकेतील कामकाजावर परिणाम होणार आहे.

36

मात्र, एसबीआयने स्टॉक एक्स्चेंजला पाठवलेल्या संपाबाबतच्या माहितीमध्ये या काळात शाखांमध्ये आवश्यक कामांसाठी त्यांच्या वतीने पर्यायी व्यवस्था केल्याचा दावा करण्यात आला आहे. असे असूनही कामावर परिणाम होऊ शकतो.

46

महिन्याच्या अखेरच्या 6 दिवसात 2 दिवस संप, 3 दिवस सुट्टी बँक व्यवस्थापनाने ग्राहकांना संपापूर्वी त्यांचे काम संपवण्यास सांगितले असले तरी 26 ते 31 जानेवारी दरम्यान ग्राहकांना त्यांचे काम संपवण्याची संधी 27 जानेवारीलाच मिळणार आहे. कारण 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील बँकांच्या शाखा बंद होत्या. तर 28 जानेवारीला चौथा शनिवार सुट्टीचा दिवस आहे. यानंतर 29 जानेवारीलाही रविवारची सुट्टी आहे.

56

संपामुळे सोमवार आणि मंगळवारी म्हणजेच 30 आणि 31 जानेवारीला बँका काम करणार नाहीत. यामुळे बँक फक्त शुक्रवारी म्हणजेच 27 जानेवारीला उघडतील. ज्यामध्ये ग्राहकांना त्यांचे काम पूर्ण करावे लागेल.

66

बँक युनियन संपावर का जात आहेत? पीटीआयच्या वृत्तानुसार, कामगार संघटना पाच दिवसीय बँकिंग, पेंशन अपडेट करणे आणि सर्व कॅडरमधील लोकांची भरती यासह इतर मुद्द्यांवर मागणी करत आहेत. बँक युनियन त्यांच्या मागणीसाठी दबाव निर्माण करण्यासाठी संप पुकारत आहेत. दरवर्षी जानेवारी महिन्यात बँक युनियन कर्मचाऱ्यांना संपावर जाण्याचे आवाहन करत असल्याचे अनेकदा लक्षात येते.

  • FIRST PUBLISHED :