NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / सलग चार दिवस बँका राहणार बंद, इमर्जन्सी व्यवहार करायचा असल्यास काय कराल?

सलग चार दिवस बँका राहणार बंद, इमर्जन्सी व्यवहार करायचा असल्यास काय कराल?

बँक व्यवहार करायचे असल्यास लोकांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे. कारण आजपासून सलग चार दिवस बँका या बंद असतील.

16

मुंबई, 28 जानेवारी: आजपासून 4 दिवस म्हणजे 28 ते 31 जानेवारीपर्यंत बँका बंद राहणार आहेत. बँक 28 जानेवारीला म्हणजेच आज महिन्याचा चौथा शनिवार आहे.तर 29 जानेवारीला रविवार असल्याने बँका बंद राहणार आहेत. तर 30 आणि 31 जानेवारीला पँक कर्मचारी संपावर जाणार आहेत.

26

सलग चार दिवस बँका बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ शकते. मात्र, या काळात इंटरनेट बँकिंगची सुविधा सुरू राहणार आहे. यामुळे लोक पैशाचे व्यवहार करू शकतील.

36

बँक कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 30 आणि 31 जानेवारी 2023 रोजी देशव्यापी बँक संपावर जाण्याची घोषणा केली आहे.

46

दोन दिवस बँकांचा संप असणार आहे. या संपाविषयी बोलताना देशातील सर्वात मोठी बंक भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले की, युनियन फोरम ऑफ बँक युनियन्सने 30-31 जानेवारी रोजी पुकारलेल्या दोन दिवसांच्या संपाचा परिणाम त्यांच्या शाखांमधील कामगारांवर होऊ शकतो. बँक कर्मचाऱ्यांच्या या संपात देशभरातील बँक शाखा कर्मचारी सहभागी होणार आहेत.

56

बँक कर्मचाऱ्यांच्या 5 मागण्या आहेत. पहिली बँकिंग वर्किंग कल्चरमध्ये सुधारणा करा, बँकिंग पेन्शन अपडेट करा, नॅशनल पेंशन सिस्टम (NPS) रद्द करा, पगारात सुधारणा करा आणि सर्व कॅडरमध्ये भरती करा.

66

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने UFBU शी संबंधित संघटनांना म्हणजे AIBEA, AIBOC, NCBE, AIBOA इत्यादींनी संपाची नोटीस जारी केली आहे.

  • FIRST PUBLISHED :