NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Bank Locker ची चावी हरवली तर तक्रार कशी करायची? किती चार्ज लागतो? अवश्य घ्या जाणून

Bank Locker ची चावी हरवली तर तक्रार कशी करायची? किती चार्ज लागतो? अवश्य घ्या जाणून

बँकेच्या लॉकरची चावी हरवते किंवा हरवण्याची शक्यता असते. परंतु, याबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही. कारण लॉकरची चावी हरवल्यास बँक नवीन चावी जारी करते. मात्र, यासाठी ग्राहकांना वेळेत बँकेला कळवावे लागेल.

16

देशातील लाखो लोक त्यांच्या मौल्यवान वस्तू आणि कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी बँकांमधील लॉकरच्या सुविधेचा लाभ घेतात. सर्वसाधारणपणे सर्व मोठ्या बँका लॉकरची सुविधा देतात परंतु वापरासाठी ग्राहकांकडून दरवर्षी शुल्क आकारतात.

26

बँकेत लॉकरची सुविधा घेतल्यानंतर ते उघडण्यासाठी 2 चाव्या लागतात. यापैकी एक चावी ग्राहकाकडे असते तर दुसरी बँक मॅनेजरकडे असते. लक्षात ठेवा, दोन्ही चाव्या असल्याशिवाय लॉकर उघडणार नाही. अनेक वेळा ग्राहकांच्या बँकेच्या लॉकरची चावी हरवते. अशा वेळी काय करावं? चला तर मग जाणून घेऊया.

36

ग्राहक नेहमीच महागडे दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे बँकेच्या लॉकरमध्ये ठेवत असतात. यामुळे हे प्रकरण संवेदनशील राहते. ज्याप्रमाणे सिमकार्ड हरवल्यास पोलिसांकडे तक्रार करावी लागते. त्याचप्रमाणे बँकेच्या लॉकरची चावी हरवल्यास प्रथम बँकेला कळवावे लागते.

46

एचडीएफसी बँकेच्या म्हणण्यानुसार, तुम्हाला लॉकरची चावी आणि नंबरच्या डिटेल्ससह एक अर्ज सबमिट करावा लागेल. यासोबतच पोलिस रिपोर्ट किंवा दाखल केलेल्या तक्रारीची फोटोकॉपीही द्यावी लागणार आहे.

56

यानंतर बँक तुमच्याकडून नवीन चावीसाठी शुल्क आकारेल. त्यानंतर, बँक तुम्हाला नवीन चावी केव्हा आणि कोठून गोळा करायची ते सांगेल. लॉकर भाड्याने घेणाऱ्या ग्राहकाला निर्धारित वेळेवर आणि स्थानावर उपस्थित असणे आवश्यक आहे. डुप्लिकेट चावीमुळे लॉकरमध्ये छेडछाड होण्याचा धोका असतो.

66

अशा परिस्थितीत, ग्राहकाची इच्छा असल्यास, तो पहिला लॉकर तोडून सर्व सामान दुसऱ्या लॉकरमध्ये हलवू शकतो. मात्र, या प्रक्रियेचा संपूर्ण खर्च ग्राहकाला सहन करावा लागू शकतो. लॉकर उघडण्यासाठी/हरवलेली चावी बदलण्याचे शुल्क आणि रु.1000/- (जीएसटी वगळून) भाड्याने घेणाऱ्याकडून वसूल केले जातील. ही फी बँकेनुसार बदलू शकते. आता तुम्हाला माहिती आहे की बँक लॉकरची चावी किती मौल्यवान आहे, म्हणून ती नेहमी सुरक्षित ठेवली पाहिजे.

  • FIRST PUBLISHED :