प्रायव्हेट सेक्टर बँक Axis Bank ने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना धक्का दिला आहे. बँकेने MCLR मध्ये 0.10% पर्यंत वाढ केली आहे. नवीन दर शनिवारपासून म्हणजेच 18 जानेवारीपासून लागू झाले आहेत.
ओवरनाइट दर 7.85 टक्के आहेत. एका महिन्याचे दर 7.85 टक्के, तीन महिन्यांचे दर 7.95 टक्के, सहा महिन्यांचे दर 8 टक्के, एक वर्षाचे दर 8.05 टक्के आहेत. दोन वर्षांसाठी 8.15 टक्के आणि तीन वर्षांसाठी 8.20 टक्के दर आहेत.Post Office सेविंग्स अकाउंट्मध्ये असे चेक करा बॅलेन्स, 7 सोप्या पद्धती
MCLR म्हणजे काय? MCLR म्हणजेच मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सुरू केले होते. बँक कोणत्याही ग्राहकाला या आधारभूत दरापेक्षा कमी दराने कर्ज देऊ शकत नाही. बँका अनेकदा MCLR पेक्षा जास्त दराने कर्ज देतात. याच्या मदतीने बँका कर्जाचा दर ठरवतात. जेव्हा ते वाढते तेव्हा कर्ज महाग होते आणि जेव्हा ते कमी होते तेव्हा कर्ज स्वस्त होते.क्रेडिट कार्डवर जास्त व्याज भरावं लागत असल्याने त्रस्त आहात? 'ही' ट्रिक येईल कामी
तुमच्या कर्जावरही परिणाम होईल का? कर्जाचे व्याजदर दोन प्रकारचे असतात. स्थिर व्याज दर आणि फ्लोटिंग व्याज दर. फिक्स्ड दरामध्ये कर्जाच्या संपूर्ण कालावधीत व्याज स्थिर राहते.
तर, फ्लोटिंग रेट अंतर्गत, बँकेद्वारे वेळोवेळी व्याजदर बदलला जातो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक धोरणांमध्ये कोणताही बदल केल्यास फ्लोटिंग व्याजदर बदलतो. सामान्यतः फिक्स्ड रेट फ्लोटिंग रेटपेक्षा किंचित जास्त असतो.