NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Axis बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांसाठी गुडन्यूज! आता मिळतेय 'ही' खास सुविधा

Axis बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांसाठी गुडन्यूज! आता मिळतेय 'ही' खास सुविधा

RuPay Credit Card on UPI: अॅक्सिस बँकेच्या रुपे क्रेडिट कार्डला भीम, पेटीएम, पेजॅप, मोबिक्विक, फ्रीचार्ज सारख्या निवडक UPI -इनेबल्ड अॅप्सच्या माध्यमातून वापरता येणार आहे.आता बँकेने आपल्या ग्राहकांसाठी खास सुविधा सुरु केली आहे.

15

युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI पेमेंट हा आजकाल पैशांच्या व्यवहाराचा सर्वात सोपा आणि फास्ट मार्ग आहे. UPI हा अलिकडच्या वर्षांत सर्वाधिक वापरला जाणारा डिजिटल पेमेंट मोड म्हणून आहे. आता ही सुविधा आता रुपे क्रेडिट कार्डपर्यंत वाढवण्यात आली आहे.

25

अनेक बँका आधीपासूनच क्रेडिट कार्डद्वारे त्यांच्या ग्राहकांना UPI पेमेंट सुविधा देत आहेत. आता Axis Bank रुपे क्रेडिट कार्ड यूझर्स देखील या सुविधेचा लाभ घेऊ शकतील.

35

Axis Bank चे RuPay क्रेडिट कार्ड BHIM, Paytm, PayZapp, Mobikwik, Freecharge सारख्या मोजक्या UPI-इनेबल्ड अॅप्सद्वारे वापरले जाऊ शकते. म्हणजेच आता Axis बँकेचे ग्राहक त्यांचे RuPay क्रेडिट कार्ड निवडक UPI अॅप्सशी लिंक करू शकतील. यामुळे तुम्हाला इतर बँक अकाउंटमधून यूपीआय पेमेंट करता अगदी त्याच पद्धतीने यूपीआय पेमेंट करता येणार आहे.

45

UPI सुविधेवर रुपे क्रेडिट कार्ड गेल्या वर्षी सुरू करण्यात आले होते. आता तुम्ही शेजारच्या दुकानात स्कॅन करून क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करू शकाल. यासोबतच RuPay क्रेडिट कार्डद्वारे, तुम्ही व्यापारी UPI QR कोड स्कॅन करूनच पैसे देऊ शकता. P2P पेमेंट करू शकत नाही.

55

सध्या BHIM, Paytm, Mobikwik, PayZapp, Freecharge यांसारख्या निवडक UPI अॅप्सवर 7 बँकांचे रुपे क्रेडिट लाइव्ह झाले आहे. भविष्यात, तुम्ही तुमचे RuPay क्रेडिट कार्ड इतर UPI अॅप्सशी देखील लिंक करू शकाल. सध्या, अॅक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक आणि कॅनरा बँकेचे रुपे क्रेडिट कार्डधारक UPI अॅप्स निवडण्यासाठी त्यांचे कार्ड लिंक करू शकतात.

  • FIRST PUBLISHED :