NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Airplane Facts: विमानाला हॉर्न असतं का? ते कसं काम करतं? इंट्रेस्टिंग आहे फॅक्ट

Airplane Facts: विमानाला हॉर्न असतं का? ते कसं काम करतं? इंट्रेस्टिंग आहे फॅक्ट

Airplane Facts: तुम्हाला माहित आहे का की विमानांना देखील हॉर्न असतात? याचं उत्तर हो असेल तर ते कसं काम करतं हे जाणून घेणं इंट्रेस्टिंग आहे.

16

Airplane Interesting Facts: रस्त्यावर गाडी चालवताना, समोरच्या कोणत्याही वाहनाकडून साइड घेण्यासाठी किंवा आपण मागे आहोत हे दाखवण्यासाठी हॉर्नचा वापर केला जातो. अशा प्रकारे ट्रेनमध्ये देखील हॉर्नचा वापर केला जातो. ट्रेनमध्ये एक नाही तर अनेक प्रकारे हॉर्न वाजवला जातो आणि प्रत्येक हॉर्नचा स्वतःचा वेगळा अर्थ असतो. विमानांची दुनिया या सिरीजमध्ये आपण आज हॉनविषयी माहिती घेणार आहोत.

26

तुम्हाला विमानाच्या हॉर्नबद्दल माहिती आहे का? तसे, अनेकांना विमानात हॉर्न आहे की नाही हे माहित नसते. आज आम्ही तुम्हाला सांगतो की विमानात हॉर्न असतो का आणि असेल तर त्याचा उपयोग काय?

36

विमानांना हॉर्न असतात का? : टेक्निकली, विमानांना हॉर्न असतात. हा हॉर्न वेगळ्या प्रकारचा असून तो सर्वसामान्य वाहनांसारखा नसतो. या हॉर्नने पक्षी किंवा हवेतील इतर विमानांना सूचना दिली जाते असे नाही. हा हॉर्न हवेत वाजवला जात नाही.

46

हा हॉर्न काय करतो? : विमानाचा हॉर्न अलर्ट किंवा अलार्म म्हणून काम करतो. याद्वारे विमानाच्या केबिनमधून इतर कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला जातो. कोणतीही अडचण आल्यास कर्मचाऱ्यांना सतर्क केले जाते. याशिवाय एक हॉर्न ग्राउंडवर कामी येतो.

56

या हॉर्नद्वारे ग्राउंड स्टाफला विमान उड्डाणासाठी सज्ज असल्याची माहिती दिली जाते आणि त्यानंतर विमान उडवले जाते. हे हॉर्न सामान्य हॉर्नसारखेच असते.हे हॉर्न विमानाच्या चाकांजवळ बसवलेले असतात. त्यांच्या आवाजात फरक आहे. कोणत्याही विमानाच्या हॉर्नचा आवाज हे विमान बनवणाऱ्या कंपनीवर अवलंबून असते.

66

विमानाचा हॉर्न अलार्म बटण किंवा इशारा देण्यासाठी कामी येतो. असे म्हणता येईल. ज्याद्वारे विमान आणि इतर कर्मचारी यांच्यात संपर्क स्थापित केला जाऊ शकतो.

  • FIRST PUBLISHED :