NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / रेपो रेट वाढवल्यानंतर कितीने वाढणार EMI? सोप्या शब्दात समजून घ्या कॅल्क्यूलेशन

रेपो रेट वाढवल्यानंतर कितीने वाढणार EMI? सोप्या शब्दात समजून घ्या कॅल्क्यूलेशन

आरबीआयच्या रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर सार्वजनिक-खासगी बँकांपासून ते हाऊसिंग फायनान्स कंपन्यांपर्यंत गृहकर्जाचे व्याजदर वाढणार आहेत.

16

नवीन वर्षात आता तुमच्या होम लोनचे ईएमआय महाग झाले आहे. 2023 चे पहिले पतधोरण जाहीर करताना, RBI ने पॉलिसी रेट्समध्ये बदल करताना रेपो रेटमध्ये एक चतुर्थांश टक्क्यांनी वाढ केली. रेपो रेट 6.25 टक्क्यांवरून 6.50 टक्के करण्यात आलाय. यापूर्वी RBI ने 2022 मध्ये पाच पतधोरण बैठकांमध्ये रेपो रेटमध्ये 2.25 टक्क्यांनी वाढ केली आहे.

26

आरबीआयच्या रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर सार्वजनिक-खासगी बँकांपासून ते हाऊसिंग फायनान्स कंपन्यांपर्यंत गृहकर्जाचे व्याजदर वाढतील, त्यानंतर तुमचा ईएमआय महाग होईल. तुमचा EMI किती महाग होईल ते आपण आज जाणून घेऊया.

36

25 लाखांवर किती? - समजा देशातील सर्वात मोठी बँक SBI ला 20 वर्षांसाठी 25 लाखांच्या गृहकर्जासाठी 8.60 टक्के व्याजदराने 21,854 रुपये EMI भरावे लागत होते. परंतु रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंट्सच्या वाढीनंतर, व्याज दर 8.85 टक्क्यांपर्यंत वाढेल. ज्यावर EMI 22,253 रुपये भरावा लागेल. म्हणजेच तुमचा EMI सुमारे 400 रुपयांनी महाग होईल.

46

40 लाखांवर किती? - सध्या, 8.60 टक्के व्याजदराने 20 वर्षांसाठी 40 लाख रुपयांच्या गृहकर्जासाठी EMI 34,967 रुपये आहे. परंतु रेपो रेटमध्ये 0.25 टक्के वाढ केल्यानंतर 8.85 टक्के दराने व्याज द्यावे लागेल, ज्यावर 35,604 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. म्हणजेच प्रत्येक महिन्याला 637 रुपये अधिक EMI भरावे लागणार आहेत.

56

50 लाखांवर किती? - 15 वर्षांसाठी 50 लाख रुपयांच्या होम लोनवर, 8.60 टक्के दराने EMI 49,531 रुपये भरावा लागत होता. पण रेपो दरात वाढ झाल्यानंतर आता 50,268 रुपयांचा ईएमआय भरावा लागणार आहे. म्हणजे दरमहा 737 रुपये महाग होईल.

66

20 वर्षांसाठी किती? - 20 लाखांच्या होम लोनवर 8.6 टक्के दराने EMI 17483 भरावा लागत होता. पण रेपो दरात वाढ झाल्यानंतर 17802 EMI भरावा लागेल. म्हणजेच दरमहा 319 रुपयांनी महाग होईल.

  • FIRST PUBLISHED :