एअर कंडिशनरमुळे गर्मी कमी होते. कारण खूप जास्त उकडायला लागल्यावर पंखे आणि कूलरही काम करत नाही. अशा परिस्थितीत अनेकांच्या घरात एसी बसवले आहेत.
काही लोक वर्षानुवर्षे एसी वापरत आहेत. परंतु काही लोकांनी नोटिस केलं असेल की, त्यांच्या खोलीतील कूलिंग पहिल्याच्या तुलनेत कमी राहते.
याची अनेक कारणे असू शकतात, त्यापैकी एक म्हणजे त्याच्या फिल्टरवर घाण साचलेली असते. जे एसीचे जुने यूझर्स आहेत त्यांना माहित असेल की एसीच्या पॅनेलमध्ये एक एअर फिल्टर आहे, ज्यावर धूळ खूप लवकर जमा होते.
जर हे फिल्टर ब्लॉक झाले असतील तर कंप्रेसर चांगले कूलिंग करु शकत नाही. म्हणूनच ते स्वच्छ ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
जे अनेक वर्षांपासून एसी वापरत आहेत, त्यांनी एसी फिल्टर कधी ना कधी साफ केलाच असेल, परंतु नवीन यूझर्सला याबद्दल कदाचित माहिती नसेल.
पण ते कसे तपासायचे किंवा कधी साफ करायचे हे आपल्यापैकी फार कमी लोकांना माहीत असेल.
फिल्टर किती दिवसात स्वच्छ करावं? एसीच्या एअर फिल्टरवर धूळ खूप वेगाने जमा होते. धूळीने माखलेला एसी फिल्टर एयरफ्लो कमी करू शकतो आणि एसीचे थंड होणे थांबवू शकतो. चांगला एयरफ्लो आणि कूलिंगसाठी दर दोन आठवड्यांनी फिल्टर साफ करण्याचा सल्ला दिला जातो. विंडो एसी आणि स्प्लिट एसी दोन्हीमध्ये फिल्टर लावलेला असतो.