सध्याच्या काळात आधारकार्ड अत्यंत महत्त्वाचं झालंय. जवळपास सर्वच सरकारी कामांसाठी आधारकार्डचा वापर होतो. बँक अकाउंट ओपन करण्यासाठी आधारकार्ड अनिवार्य असतं. बँकेची केवायसी देखील आधार कार्डच्या माध्यमातून केली जाते. अशा वेळी जर आपला आधार नंबर कोणाकडे गेला तर आपलं बँक अकाउंट हॅक होऊ शकतं का असा प्रश्न अनेकांना पडतो. याचे डिटेल्स आपण आज जाणून घेऊया.
आधारकार्ड हे UIDAI कडून मॅनेज केलं जातं. आधार नंबर जाणून बँक अकाउंट हॅक करणाऱ्या प्रश्नावर यूआयडीएआयने आपल्या ऑफिशियल पोर्टल https://uidai.gov.in/ वर एक सविस्तर माहिती शेअर केली. UIDAI च्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध 'आधार मिथ बस्टर्स' नुसार, हा दावा अत्यंत चुकीचा आहे. आधार नंबर कळाल्यावर कोणीही तुमचं बँक अकाउंट हॅक करु शकत नाही.
UIDAI ने म्हटलं की, फक्त एटीएम पिनच्या माध्यमातून जसं मशीनमधून पैसे काढता येत नाही. त्याच प्रमाणे केवळ आधार नंबरच्या आधारे बँक अकाउंट हॅक केलं जाऊ शकत नाही.
जोपर्यंत तुम्ही कोणालाही तुमचा बँकिंग अकाउंट पिन, पासवर्ड किंवा ओटीपी शेअर करत नाही. तोपर्यंत तुमचं अकाउंट अगदी सुरक्षित राहील.
UIDAI ने यूझर्सला निश्चिंत राहण्याचा सल्ला दिला आहे. संस्थेने म्हटलं की, आधार नंबरच्या सहाय्याने बँक अकाउंट हॅक करणे किंवा पैशांची हेराफेरी करण्याचे कोणतेही प्रकरण अद्याप समोर आलेले नाही. फक्त आधार नंबरच्या सहाय्याने पैशांचा फ्रॉड केला जाऊ शकत नाही.