NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / PPF, NSC सारख्या योजनांमध्ये पैसे गुंतवलेय? चुकूनही विसरु नका हे काम, अन्यथा...

PPF, NSC सारख्या योजनांमध्ये पैसे गुंतवलेय? चुकूनही विसरु नका हे काम, अन्यथा...

तुम्हीही पब्लिक प्रोव्हिडेंट फड आणि नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट सारख्या पोस्ट ऑफिस स्किममध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.

15

Small Savings Scheme: अर्थ मंत्रालयाने छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य केलेय. तुम्ही पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, सीनियर सिटीझन सेव्हिंग्ज स्कीम किंवा पोस्ट ऑफिस स्कीममध्येही गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला तुमचे आधार कार्ड पोस्ट ऑफिस किंवा तुमच्या बँक शाखेत 30 सप्टेंबर 2023 पर्यंत जमा करावे लागेल.

25

या तारखेपर्यंत आधार कार्ड सबमिट केले नाही तर तुमचे लहान बचत गुंतवणूक खाते फ्रीज केले जाऊ शकते. सध्याच्या लहान बचत योजनांशी आधार कार्ड लिंक करण्याचा आदेश सरकारने 31 मार्च 2023 रोजी अधिसूचनेद्वारे जारी केला होता.

35

सरकारने अधिसूचनेत काय म्हटलेय? : अधिसूचनेनुसार, जर डिपॉझिटरने आधीच अकाउंट उघडले असेल आणि त्यांनी आपले आधार कार्ड जमा केले नसेल, तर त्यांना 1 एप्रिल 2023 ते 30 सप्टेंबर 2023 या सहा महिन्यांच्या आत आधारकार्ड जमा करावं लागेल. या अधिसूचनेत छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पॅन आणि आधार क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे.

45

अकाउंट फ्रीज झालं तर काय होईल? : नोटिफिकेशनमध्ये असं म्हटलंय की, सहा महिन्यांच्या आत म्हणजे 30 सप्टेंबर 2023 पर्यंत आधार क्रमांक पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या शाखेत जमा केला नाही तर लहान बचत गुंतवणूक फ्रीज जाईल. असं झाल्यास गुंतवणूकदारांना या समस्यांना सामोरे जावे लागू शकते

55

देय व्याज गुंतवणूकदाराच्या बँक खात्यात जमा केले जाणार नाही. कोणतीही व्यक्ती त्याच्या PPF किंवा सुकन्या समृद्धी खात्यांमध्ये पैसे जमा करू शकणार नाही.मॅच्योरिटी अमाउंट गुंतवणूकदारांच्या बँक अकाउंटमध्ये क्रेडिट केली जाणार नाही.

  • FIRST PUBLISHED :