NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / विदेशांमधून येणाऱ्या WhatsApp कॉलने देश त्रस्त! बचावासाठी तत्काळ करा हे 5 काम

विदेशांमधून येणाऱ्या WhatsApp कॉलने देश त्रस्त! बचावासाठी तत्काळ करा हे 5 काम

सायबर गुन्हेगार अनेक दिवसांपासून व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून लोकांची फसवणूक करताना दिसताय. मात्र, यावेळी गुन्हेगार लोकांना फसवण्यासाठी नवीन टेक्निकचा वापर करताय. आता लोकांना आंतरराष्ट्रीय नंबरवरून कॉल केले जात आहेत आणि पार्ट टाइम जॉबची ऑफर दिली जातेय.

16

गेल्या काही आठवड्यांत व्हॉट्सअपवर आंतरराष्ट्रीय नंबरवरून कॉल येण्याच्या अनेक घटना वाढल्या आहेत. अनेक भारतीयांनी ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आंतरराष्ट्रीय नंबरवरून कॉल आणि मॅसेज मिळाल्याची माहिती दिली आहे. हे कॉल अननोन नंबरवरून येतात. अनेक वेळा युजर्सना याचा त्रास होतो. पण हे कॉल साधे समजण्याची चूक करु नका. यामधून तुमची फसवणूकही होऊ शकते. यासाठी नेमकं काय करावं ते पाहा...

26

कॉल उचलू नका: तुम्हाला एखाद्या आंतरराष्ट्रीय नंबरवरून कॉल आला जो अननोन आहे. तो कॉल उचलू नका. कारण, असे कॉल्स तुम्हाला कोणत्याही फसवणुकीत ढकलू शकतात.

36

पैसे कमावणाऱ्या मेसेजपासून दूर राहा: तुम्हाला आंतरराष्ट्रीय नंबरवरून मेसेज करून पैसे कमवण्याची ऑफर दिली जात असेल. तर याचं उत्तर देऊ नका आणि रिपोर्ट करा.

46

ब्लॉक नंबर: तुम्हाला एखाद्या इंटरनॅशनल नंबरवरून वारंवार कॉल येत असेल तर तो लगेच ब्लॉक करा. यासाठी तुम्हाला आधी कॉल लॉगवर जावं लागेल. त्यानंतर त्याच्या प्रोफाइल फोटोवर क्लिक करा. येथे खाली तुम्हाला ब्लॉकचा ऑप्शन मिळेल.

56

रिपोर्ट करा: तुम्हाला असे वाटत असेल की ज्या नंबरवरून तुम्हाला सतत कॉल किंवा मेसेज येत आहेत. तो कोणत्याही स्पॅम, फसवणूक किंवा क्रिमिनल कामांचा भाग असेल तर त्याला रिपोर्ट करा. यासाठी तुम्हाला कॉल लॉगमध्ये जाऊन प्रोफाईल फोटोवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर खाली तुम्हाला Report चा ऑप्शन दिसेल.

66

टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन ऑन करा: तुम्ही कोणताही संभाव्य धोका टाळण्यासाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन चालू केले नसेल. तर ते लगेच इनेबल करा. यासह, अकाउंटमध्ये लॉग इन करताना तुम्हाला एक व्हेरिफिकेशन कोड आवश्यक असेल. यासाठी तुम्हाला Settings > Account > टू-स्टेप व्हेरिफिकेशन वर जावे लागेल. त्यानंतर 6 अंकी पिन टाकून तो ऑन करावा लागतो.

  • FIRST PUBLISHED :