रिटर्न भरण्याचा सर्वात महत्त्वाचा आणि पहिला नियम म्हणजे तुम्हाला तुमचे डिटेल्स आयटीआर फॉर्ममध्ये अचूक भरावा लागेल. फॉर्म भरताना लक्षात ठेवा की, तुमच्या नावाचे स्पेलिंग, पत्ता, ईमेल आणि फोन नंबर इत्यादी माहिती पूर्णपणे बरोबर असावी.
फोन नंबर किंवा नावाच्या स्पेलिंगमध्ये चूक झाली असेल तर तुम्हाला रिटर्न मिळण्यास उशीर होऊ शकतो. तुमच्या बँक अकाउंटसोबत लिंक केलेला मोबाईल नंबर एंटर करा. जेणेकरून तुम्हाला आयकर विभागाकडून रिटर्न किंवा रिफंडशी संबंधित एसएमएस मिळू शकेल आणि तुम्हाला वेळेवर माहिती मिळू शकेल.
लवकर रिफंड मिळवण्यासाठी तुमचे बँक अकाउंट आधीच व्हॅलिडेट करणे आवश्यक आहे. रिटर्न (ITR) भरल्यानंतर तुमचे रिफंड तयार झाले तर इन्कम टॅक्स विभाग तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे पाठवते. तुमचे बँक खाते आधीच वैध नसल्यास रिटर्न मिळण्यास उशीर होऊ शकतो
कंपनीने कापलेल्या TDS च्या TAN चे डिटेल्स देखील आपल्या रिटर्न फॉर्ममध्ये योग्यरित्या भरले पाहिजेत. म्हणूनच रिटर्नसाठी 26AS फॉर्म देखील चेक केला पाहिजे. जेणेकरून TDS आणि TCS ची अचूक माहिती रिटर्न फॉर्ममध्ये मिसळता येईल. रिटर्न भरताना त्याची जुळवाजुळव करणे आवश्यक आहे, कारण थोडीशी चूक झाल्यास तुम्हाला अधिक कर भरावा लागू शकतो.
सामान्य माहिती तुम्हाला माहिती असेलच, परंतु जर तुमचे परदेशी बँकेत खाते असेल, तर त्याची माहिती रिटर्न फॉर्ममध्ये देणे आवश्यक आहे. तुमचे परदेशी बँकेत अकाउंट असेल तर त्याची माहिती इथे देण्याची गरज नाही असे समजू नका. याशिवाय, तुम्ही परदेशी बाजारात गुंतवणूक केली असली तरी, तुम्हाला ही माहिती ITR 2 फॉर्ममध्ये द्यावी लागेल.
लग्न आणि इतर समारंभांव्यतिरिक्त, सण आणि वाढदिवसाला मिळणाऱ्या भेटवस्तूंची माहितीही तुमच्या रिटर्न फॉर्ममध्ये भरणे आवश्यक आहे. तुम्हाला 50 हजार रुपयांपेक्षा जास्त गिफ्ट मिळाले असेल तर तुम्ही त्याची माहिती लपवू शकत नाही. रिटर्नमध्ये तुम्ही ही माहिती दिली नाही तरी आयकर विभागाला कळेल. माहिती लपवल्यास विभाग तुम्हाला रिटर्न देणार नाही आणि नोटीस पाठवून जाब विचारला जाईल.