मुंबई : मुंबईत सलग पाऊस नसला तरी अधून मधून मुसधार सरी सुरू आहेत. मात्र दमट हवामानामुळे मुंबईत खूप जास्त उकाड्याचा सामना करावा लागत आहे. तर उपनगरात पावसाने जोर धरला आहे. राज्यात पुढचे चार दिवस हवामानाची स्थिती कशी असेल ते जाणून घेऊया.
के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील 4-5 दिवस मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा त्यांनी इशारा दिला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मोसमात पहिल्यांदाच मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
आज कोकण आणि विदर्भात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता.चंद्रपूरमध्ये जोरदार पाऊस राहू शकतो. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आज यलो अलर्ट तर विदर्भातही यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुण्यात आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात आज हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मान्सून हंगाम सुरू झाल्या पासून राज्यात पहिल्यांदाज १६ जुलै रोजी सामन्य पावसाची नोंद करण्यात आली आहे. कोकण आणि विदर्भ प्रथमच सामान्य श्रेणीत आले आहेत.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा अजूनही सामान्यपेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. मात्र या आठवडाभरात हा पण बदल होईल अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.