हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये पावसाचा रेड किंवा ऑरेंज अलर्ट नाही
काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ठाणे, पुणे, मुंबई, पालघर, रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांना आज यलो अलर्ट आहे
यासोबतच विदर्भातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे
विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्येही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे
पुण्यात पुढील 3-4 दिवस मुसळधार पाऊस हजेरी लावेल
मुंबईमध्ये मात्र रविवारपासून पावसाचा जोर ओसरेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे