आजपासून पुढील 3-4 दिवस कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
9 जून रोजी वादळ आणि विजांच्या कडकडाटासह तसंच हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या वादळी वाऱ्यासह पाऊस कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी होण्याची शक्यता आहे.
मात्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये तापमानात फारसा बदल होणार नाही
त्यामुळे पुढचे आणखी काही दिवस नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.
तर, भारतीय हवामान विभागातील शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळपासूनच केरळात पावसाने हजेरी लावली
मान्सून सुरू होण्याच्या परिस्थितीसाठी हे आशादायक असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र केरळमध्ये मान्सून पोहोचला असल्याची अधिकृत घोषणा अद्याप केली गेली नाही.
यंदा मान्सून केरळमध्ये दाखल होण्यास उशीर झाला आहे. परिणामी राज्यातही मान्सूनचं आगमन लांबणीवर पडलं आहे.